Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सावधान | अमेझॉनवरुन ऑनलाईन मोबाईल ऑर्डर केला अन्...

आपला ई पेपर | बीड 

सध्या सगळीकडे ऑनलाईन खरेदीवर सर्वांचाचभर असून त्यामुळे फसवणूकही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर येत आहे.ऑनलाईन खरेदी करताना अतिशय काळजी पूर्वक भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे.



नुकतेच बीडमध्ये एका तरुणाने अमेझॉनवरुन ऑनलाईन मोबाईल खरेदी केला,परंतू बॉक्समध्ये मोबाईल ऐवजी दोन कपडे धुण्याच्या साबणी आढळून आल्या.याप्रकरणी तरुणाने सायबर पोलीसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.


रमेश प्रभाकर गायकवाड (रा.भक्ती कन्स्ट्रक्शन, बीड) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,त्यांनी दि 29 मे रोजी अ‍ॅमेझॉन वेबसाईड वरुन ऑनलाईन वन प्लस कंपनीचा मोबाईल रक्कम रुपये 28 हजार 998 हा एसबीआय के्रडिट कार्ड एमआयवरुन 2 हजार 617 रुपये हप्त्याप्रमाणे खरेदी केला. 

दि.2 जून रोजी अ‍ॅमेझॉन यांचे पार्सल आले.ते उघडल्यानंतर त्यामध्ये मोबाईल आढळून आला नाही.त्याऐवजी दोन इएक्सओ कंपनीच्या कपडे धुण्याच्या दोन साबणी आढळून आल्या.याचा पूर्ण व्हिडीओ करण्यात आला आहे. फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करावी,अशी तक्रार सायबर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या