Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दुर्दैवी घटना |सावधान मुलींनो |प्रेमविवाहचा पश्चाताप 3महिन्यात आयुष्य संपवलं...

आपला ई पेपरबीड 


पुण्यामधील प्रेमातील घटनेत...भरदिवसा हत्या.. ही अहमदनगरची एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण वनरक्षक अधिकारी हीचीच्या हत्याची घटना ताजीच असताना पुन्हा एकदा प्रेमाच्या घटनेत प्रेम विवाह केलेल्या आष्टी तालुक्यातील ठोंबळसांगवीत प्रेम विवाहमुळे पायालला शेवटी गळफास घेऊन आत्महत्या करावी लागली. म्हणून वाटते मुलींनो सावधान अशा दुर्दैवी घटनांची बळी जाण्यापेक्षा आई-वडिलांचे संस्कर संस्कृती जोपासा

या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सासू आणि पतीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पायल आदेश चौधरी वय 20 वर्षे असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. पती आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पायलने आत्महत्या केली.

आष्टी तालुक्यातील कडा येथील पायल गोंदकर हिचे ठोंबळ सांगवी इथल्या आदेश चौधरी याच्यावर प्रेम जडले होतं. याच प्रेमाचं रुपांतर तीन महिन्यांपूर्वी लग्नात झाले. एकमेकांवर जीवापाड प्रेम असलेल्या या जोडप्याने सुखी संसाराचे स्वप्न पाहिले होते. पण काही दिवसातच घरातील वातावरण खराब होऊ लागले. सासू आणि पती वारंवार त्रास देऊ लागल्याने प्रेम कमी झाले. याच त्रासातून स्वत:ची सुटका करण्याचा निर्णय पायलने घेतला. पती अहमदनगरला तर सासू शेळ्या चारण्यासाठी गेली होती. हीच संधी साधत तिने नको आयुष्य म्हणत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

आरोपी सासू आणि पती अटक ...पायलचे मामा दत्तात्रय लेकुरवाळे रा. कुसडगांव ता.जामखेड. जि.अहमदनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अंभोरा पोलीस ठाण्यात पती आदेश चौधरी, सासू अलका चौधरी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सासू आणि पतीला अटक करण्यात आली आहे.


*परळीत जागरूक व्यापारी व पत्रकारितेमुळे कुटुंबांचा आनंद गगनात मावेना....*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_83.html*

*परळीत भगव वादळ | शिवसेना ...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_33.html*

*धक्कादायक | परळी शहरात एकाची हत्या... पोलीस तपास सुरू*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_60.html*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या