Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत जागरूक व्यापारी व पत्रकारितेमुळे चिमुकल्याला त्याचे आई-वडील मिळाले...

आपला ई पेपर

परळी शहरातील सामाजिक ऐक्य अजूनही लोकांनी जोपासले आहे. तसेच माणुसकी हा एक भाग असतो तो जीवनाचा अविभाज्य भाग आहे संकट काळात माणुसकीच माणसाला मदत करत असते. याचाच प्रत्यय आज परत जागरूक पत्रकार दीपक गीते व प्रतिष्ठित व्यापारी प्रभात लाईट हाऊसचे  प्रवीण मानधने यांच्या या कार्यातून स्पष्ट झाले. एक पाच वर्षाचा मुलगा मोंढा मार्केटमध्ये त्यांना सापडला असता त्यांनी अनेक ठिकाणी चौकशी करून परळी पोलीस स्टेशनला संपर्क करून अखेर तो लहान मुलगा.. आई-वडिलांकडे स्वाधीन केला.


सोशल मीडिया आणि पत्रकारिता हा एक लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. जनसामान्यांच्या मदतीसाठी धावून जाणारा स्तंभ आहे हे आज त्यांनी कार्यातून दाखवून दिले.


 लहान मुलांला त्याचे कुटुंब मिळाल्यानंतर कुटुंबाला मुलगा मी आल्यानंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद हा शब्दात व्यक्त करणे आणि आनंदाची परिसीमा चेहऱ्यावरील तो आनंद टिपण्यासारखा असतो हा अनुभव आज मिळाला...

 पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन सदरील मुलं आई वडिलांच्या स्वाधीन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या