Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड येथे लग्नासाठी निघालेल्या मित्रांचा अपघात | तिघांचा जागीच मृत्यू...

आपला ई पेपरबीड

बीडच्या घोसापुरी शिवारात पहाटेच्या सुमारास कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. या भीषण अपघातात तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


अपघातात कारचाही चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करत परिस्थिती नियंत्रणात
आणली.

मित्राच्या लग्नासाठी 4 मित्र नगरहून बीडला येत होते. गाडीवरील नियंत्रण सुटले अन् घात झाला धीरज गुंदेजा, रोहन वाल्हेकर, विवेक काणगुणे अशी मयत तरुणांची नावे आहेत, तर आनंद वाघ असे जखमीचे नाव आहे. कारमधील चौघेजण अमहदनगरमधील नेवासा येथील रहिवासी आहेत. हे चौघेजण मारुती सुझुकी कारने बीडला मित्राच्या लग्नाला चालले होते. मध्यरात्री 2.15 वाजण्याच्या सुमारास पेंडगावजवळ घोसापुरी शिवारात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यानंतर गाडी रोडच्या बाजूला पलटी झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या