Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत भगव वादळ | शिवसेना आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर...

वॉर्ड निहाय मजबूत शाखा बांधणी करा शिवसेना जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे..


परळी | प्रतिनिधी 

आगामी पालिका निवडणुका डोळ्या समोर ठेऊन परळी शहरातली प्रत्येक वार्ड मध्ये शिवसेनेची शाखा स्थापन करा. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून झाले पाहिजे, वेळ पडली तर जनतेसाठी या भ्रष्ट नगर पालिका प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करा मी तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे. 


परळी नगर पालिकेवर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्या साठी सज्ज रहा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर अप्पा शिंदे यांनी केले आहे. शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या रुपाने परळी मध्ये खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी आहे.शहरातील सर्व वार्डात शाखा बुथनिहाय दहा शिवसैनिक तयार करून पक्षप्रमुखाना वाढदिवसाच्या अनोखी भेट देऊ असा संकल्प करण्यात आला.


      शिवसेना उपनेते चंद्रकात खैरे, उपनेत्या सुषमा ताई अंधारे बीड जिल्हा संपर्कप्रमुख किशोर जी पोतदार लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार सुनील दादा धांडे सर सह संपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख रत्नाकर अप्पा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत परळी शहर शिवसेनेची आढावा बैठक सुषमा ताई अंधारे यांच्या संपर्क कार्यालयात आज दुपारी एक वाजता  संपन्न झाली. शिव प्रतिमेचे पूजन करून आढावा बैठकीस सुरुवात करण्यात आली. जिल्हा प्रमुख रत्नाकर अप्पा शिंदे यांचे शहर शिवसेनेच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. 

शिवसेनेची आगामी काळातील असणारी वाटचाल याबद्दल उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर, तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, विधान सभा प्रमुख राजा भैय्या पांडे यांनी उपस्थीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले तर बैठकीचे प्रस्ताविक शहर प्रमुख राजेश विभुते तर सूत्र संचालन सुदर्शन यादव यांनी केले.    

     या बैठकीला  जिल्हा सह संघटक रमेश चौंडे, युवासेना जिल्हा समन्वयक प्रा. अतुल दुबे, जेष्ठ नेते नारायण दादा सातपुते, भोजराज पालीवाल, जगन्नाथ साळुंखे, सतीश अण्णा जगताप, युवासेना उपजिल्हा प्रमुख दीपक शिंदे, तालुका प्रमुख संतोष चौधरी, शहर सचिव विशाल गावडे, उपशहर प्रमुख मोहन राजमाने, सुरेश परदेशी, महेश केंद्रे, प्रकाश साळुंखे, रविराज गुट्टे, तुकाराम नरवाडे, किशन बुंदेले, धनंजय गोतावळे, राजेश शिंदे, नवनाथ विभुते, संतोष साखरे, भागवत करपुडे, बालू गर्जे, महिला आघाडीच्या यमुनाताई साखरे, प्रमिलाताई लांडगे, श्रीनाथ विभुते, बळी घोगरे, संजय सोमाणी आदी शिवसैनिक उपस्थीत होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या