Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

या तरुण वकीलाचा गळफास अवस्थेत मृतदेह आढळला आत्महत्या? घातपात चौकशी सुरू

 


तरुण वकीलाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आत्महत्या? घातपात चौकशी सुरू

आपला ई पेपर / Beed


बीड जिल्ह्यातील आष्टी येथील न्यायालयातील विधिज्ञ शत्रुघ्न गर्जे वय ३२ यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. ही घटना आज रविवारी सकाळी 6 च्या सुमारास समोर आली आहे. या घटनेत आत्महत्या की घातपात याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.




शत्रुघ्न गर्जे मागील काही वर्षांपासून आष्टीच्या न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होते.ते कापसी येथील मूळचे रहिवाशी असून आज सकाळी सहाच्या सुमारास गहीनीनाथगडावर जाणाऱ्या डोंगरातील रस्त्यालगत असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.आत्महत्या की घातपात याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.



 या परिसरात त्यांचा मृत्यु संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.आष्टी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.मृतदेहाचे शवविच्छेदन धामणगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येत आहे.आज दुपारी त्यांच्यावर कापसी येथे अंत्यसंस्कार करण्यात असून त्यांच्या पश्चात पत्नी,आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.


*Murder | बीड जिल्ह्यात पुन्हा काका पुतण्याचा वाद पेटला...*

*पुतण्यानी काकाची केली हत्या...*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/beed_26.html



विद्यार्थ्यांच्या शिक्षणा सोबतच क्रीडा व कलेला नाथ शिक्षण संस्थेत प्राधान्य | प्रदीप खाडे

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_26.html



*महाराष्ट्र विद्यालयाने गावातून प्रभात फेरी काढून..*

*संविधान दिन दिनाची केली जनजागृती*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_68.html



*Parli |उड्डाणपूल क्षमतेपेक्षा अधिकचा भार पेलतो आहे....*

ही सततची वाहतुक कोंडी



https://aplaepaper.blogspot.com/2022/11/parli.html

*आपला@पेपर/ Parli
रेल्वे उड्डाणपूलासाठी तीस कोटी रुपयांचा मंजूर निधी गेला...कुठे?*



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या