Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी परळी तहसील प्रशासन झाले सुसज्ज

परळी तालुक्यातील ८० ग्राम पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.सोमवार दि. २८ नोव्हेंबर पासून परळी तहसील येथे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.या अनुषंगाने परळीचा तहसील विभागाकडून परिपूर्ण तय्यारी करण्यात आली आहे. काल दिनांक २९नोव्हेंबर २०२२ रोजी १६५नामनिर्देशन पत्र तहसील कार्यालयास प्राप्त झाले असून यातील ४९ नामनिर्देशन पत्र हे सरपंच पदासाठी आलेले आहेत.




ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी परळी तहसील प्रशासन झाले सुसज्ज

आपला ई पेपर / Parli 

परळी तालुक्यातील 80 ग्रामपंचायती साठी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य या पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने निवडणुकीचे नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी दिनांक 28/11/2022 (सोमवार) ते दिनांक 02/12/2022 (शुक्रवार) (सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 )असून या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येत आहेत.अशी माहिती परळीचे तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी दिली आहे.

परळी तालुक्यातील 80 ग्रामपंचायती साठी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य या पदासाठी निवडणूक घेण्यात येणार त्यासाठी तहसील कार्यालयामध्ये एकूण 29 कक्ष स्थापन करण्यात आले असून प्रत्येक कक्षात 03 ग्राम पंचायत चे नाम निर्देशन स्वीकारण्यात येत आहेत.त्यासाठी 01 निवडणूक निर्णय अधिकारी, 02- सहायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर निवडणूक भयमुक्त व शांततेत व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तहसील प्रशासन परळी वे कडून करण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या