बीड जिल्ह्याचा होतो आहे बिहार...
आपलापेपर/Beed
बीड जिल्ह्यामध्ये नेकनूर येथे वडवणी तालुक्यातील मौजे पिंपरखेड येथे घरगुती वादातून चुलत भावाने पुतण्याची हत्या केल्याची घटना नुकतीच घडलेली असतानाच आज पुन्हा तालुक्यातील मुळूकवाडी येथे जमिनीच्या वादातून पुतण्याने चुलत्यावर हल्ला केल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली.
बीड जिल्ह्याचा होतो आहे बिहार...
बीड जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण अवैद्य धंदे तथा पोलिसांची अकार्यक्षमता यामुळे सामाजिक जनजीवन गढूळ झाले असून कायदा व पोलीस व्यवस्था नावालाच असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे.अशा घटनांनी लोकांमध्ये दहशत निर्माण तर होतो आहे. गुंडगिरी वाढते आहे.
या हल्ल्यात बळीराम मसाजी निर्मळ ,वय 80यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी केसरबाई बळीराम निर्मळ वय 70 यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान,आरोपी रोहिदास विठ्ठल निर्मळ वय 50 हा फरार असून नेकनूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
तालुक्यातील मौजे पिंपरखेड येथे दोन दिवसांपूर्वी वडवणी घरगुती वादातून चुलत्याने पुतण्याची हत्या केली होती.
*MURDER | अंबाजोगाई जवळ किरकोळ वादातून एकाचा खून एक जखमी सणाच्या दिवशीच गावात हळहळ*
👇👇👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2022/10/murder.html*
*संतोष बारटक्के*
Social Plugin