भोगी!
योग करता करता
भोगी झाले बाबा
स्त्रियां विषयी बोलताना
सुटला जीभेचा ताबा.
संन्यासी सोंग घेऊन
जमवली भलती माया
बोलुन सार्थ केलंय
बुवा तिथे बाया.
वाटलं होतं लोकांना
असेल राजकारणाचे वावडे
यांनी हातात धरले
सत्ताधाऱ्यांचे फावडे.
नेते अन् संन्यासी
बेताल बोलू लागले
आदर्शाची वाट सोडून
भलतीकडे चालू लागले!
प्रा.पंजाबराव येडे
Social Plugin