Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कर्तव्यनिष्ठ संस्थाचालक: आमदार प्रकाश दादा सोळंके

 कर्तव्यनिष्ठ संस्थाचालक: आमदार प्रकाश दादा सोळंके


मराठवाडा ही  भूमी संतांची महंतांची आणि अशा काही रत्नांची आहे ज्यांनी सर्वसामान्यांच्या विकासासाठी आपले सगळे आयुष्य वेचले.  या संतांच्या भूमीमध्ये बीड जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रात ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यामध्ये गेली तीन दशकापेक्षा अधिक काळ झाला एक व्यक्ती सर्वसामान्यांच्या हितासाठी दिवस-रात्र परिश्रम करत आहे. ती व्यक्ती म्हणजे या मराठवाड्याची सुपुत्र आणि माजलगाव तालुक्याचे भाग्यविधाते माननीय आमदार प्रकाश दादा सोळंके होय.

दादांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी असलेल्या तळमळीतून उभ्या राहिलेली सिंदफणा पब्लिक स्कूल मध्ये प्राचार्य म्हणून काम करत असताना मी अनुभवलेले संस्थाध्यक्ष आदरणीय दादा.

मागील तीन दशकाहून अधिक काळ आदरणीय आमदार प्रकाश दादा सोळंके हे राजकारणात आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी मंगलाताई सोळंके या सुद्धा जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिलेल्या आहेत. त्यांचे चिरंजीव वीरेंद्र सोळंके बाजार समितीचे सभापती आहेत. एवढी मोठी राजकीय पार्श्वभूमी असताना शाळेतील कोणत्याही शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याला  'शाळेतील काम राहू दे आणि माझा प्रचार कर' असं कधीच कुटुंबातील कोणत्याही सदस्याने आज पर्यंत सांगितलेले नाही. 


 दादांबद्दल बोलताना शाळेचे उपप्राचार्य राहुल कदम सांगतात की, २०१४ मध्ये जेव्हा दादांचा विधानसभा निवडणुकीमध्ये थोड्या मताने पराभव झाला, नंतर दादा आणि वहिनी शाळेमध्ये आले. वहिनींच्या डोळ्यात अश्रू होते. काही कर्मचाऱ्यांच्या पण डोळ्यांमध्ये अश्रू होते. दादांनी लगेच राहुल कदम यांना सांगितलं, अगोदर  पगार पत्रक स्वाक्षरी करण्यासाठी आणा, पगार पत्रकावर सह्या घ्या आणि नंतर आम्हाला भेटायला या. एखादा संस्थाचालक पराभव झाला म्हणून बीड वरून परदेशात फिरायला गेला असता. पण सदैव कर्मचाऱ्यांचा विचार करणारा संस्थाचालक म्हणजे आदरणीय प्रकाश दादा सोळंके होय. 

*नावाप्रमाणेच प्रकाशमय त्यांचे विचार, त्यांच्यामुळेच होतंय जाणसामान्यांचे स्वप्न साकार*

💥💥👇💥💥💫
*https://aplaepaper.blogspot.com/2024/01/blog-post_79.html*

मी प्राचार्य म्हणून सिंदफणा पब्लिक स्कूल मध्ये काम करत असताना गेल्या दोन वर्षांमध्ये आदरणीय वहिनींच्या आग्रहास्तव दादा फक्त एकदा शाळेतील मिटींगला आले. त्याचबरोबर गेल्या दोन वर्षांमध्ये माझी केवळ तीन वेळेस आदरणीय दादांची भेट झाली.एखाद्या व्यक्तीवर विश्वास टाकल्यावर त्या व्यक्तीला सर्व अधिकार देऊन काम करण्यासाठी मोकळीक कशी द्यावी, हे इतर संस्था चालकांनी आदरणीय दादांकडून शिकणे गरजेचे आहे. याचा अर्थ असाही नाही की त्यांचं संस्थेवर लक्ष नसतं परंतु संस्थाध्यक्षाने वारंवार छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करू नये या मताचे दादा आहेत. नुकतीच घडलेली दुर्दैवी घटना म्हणजे ३० ऑक्टोबर २०२३ रोजी आदरणीय आमदार प्रकाश दादा सोळंके यांचं घर जळताना सबंध महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलं. काही समाजकंटकांनी त्यांच्या घराची पूर्ण तोडफोड केली. पाय ठेवायलाही जागा नव्हती एवढे दगड आणि काचा पूर्ण घरामध्ये होत्या. काही कर्मचाऱ्यांना वाटलं दादांचे इतकं नुकसान झालं. आता पगार लवकर होणार नाही. पण एक नोव्हेंबरला दादांचा फोन आला आणि सांगितलं पगारपत्रक आणि त्याचा धनादेश लवकरात लवकर पाठवा माझ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे. 

हा आम्हा सर्व कर्मचाऱ्यांसाठी सुखद धक्का होता. बऱ्याच राजकीय लोकांच्या शाळा कॉलेजेस आहेत परंतु काही जणांचे पगार वेळेवर होत नाहीत काही जणांचे पीएफ जमा केल्या जात नाहीत परंतु दादांच मत असं असतं की माझ्या कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या खात्यावर जमा झाला पाहिजे. बऱ्याच संस्थांमध्ये अध्यक्ष महोदय येतात आणि प्राचार्यांना त्यांची खुर्ची सोडून अध्यक्षांना खुर्ची द्वावी लागते आणि एखाद्या सेवकाप्रमाणे त्यांच्या समोर- समोर करावे लागते. आदरणीय वहिनीसाहेब जेव्हा कधी शाळेत आल्या, तेव्हा त्यांनी सर तुम्ही तुमच्या खुर्चीवर बसा मी समोर बसते, असं त्या म्हणतात.  हे मोठेपण शिक्षकांबद्दल आदर असणाऱ्या व्यक्तीकडेच असते.आदरणीय दादा असो किंवा वहिनी सेवकांपासून ते प्राचार्यांबद्दल असलेला मान त्यांच्या वागणुकीतून दिसून येतो.मध्यंतरी आर बी अट्टल कॉलेजच्या प्राचार्या डॉ.रजनी शिकरे आणि माझी भेट झाली त्यावेळेस त्यांनी मला सांगितले की आमच्या कॉलेजला जेव्हा नॅक समितीचा उत्कृष्ट ग्रेड मिळाला तेव्हा दादांनी प्रत्यक्ष फोन करून माझे कौतुक केले. सह्याद्री सारख्या उंच विचाराचे आणि कर्तुत्वाच्या व्यक्तीचे पाय मात्र कायम जमिनीवर असतात. कुणाकडूनही ज्यावेळेस चांगले काम होते तेव्हा ते त्याची स्तुती करायचं कधीही विसरत नाहीत


सदैव संस्थेतील कर्मचाऱ्यांचे हित बघणाऱ्या आदरणीय दादा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे मार्गदर्शन आम्हाला सदैव मिळत राहो आणि आपणास दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.

प्राचार्य,अन्वर शेख,

सिंदफणा पब्लिक स्कूल माजलगाव

*खूशखबर...
परळीच्या प्रवीण वाघमारे यांनी..

*अयोध्येच्या राम जन्मोत्सवाच्या आयोजित कार्यक्रमात बीड जिल्ह्याचे नाव इतिहासात दर्जे केल*
💥💥💥👇💥💥💫

*https://aplaepaper.blogspot.com/2024/01/blog-post_13.html*

TOP MOST Video राम..देशभर व्हायरल..जबरदस्त कविता*
💥💥👇💥💥

*https://aplaepaper.blogspot.com/2024/01/youtube-video-player.html*

*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा हेडलाईन न्यूज*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*
*🎯👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या