Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मी अनुभवलेले दादा....नावाप्रमाणेच प्रकाशमय त्यांचे विचार, त्यांच्यामुळेच होतंय जाणसामान्यांचे स्वप्न साकार

 


प्रकाशदादा नावाप्रमाणेच प्रकाशमय आहेत त्यांचे विचार. राजकारणाचा वारसा लाभलेले आपले दादा यांनी राजकारणात स्वतःला तन, मन, आणि धनाने जनसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. राजकारण म्हंटले कि चढ -उतार येतातच.सुरवातीच्या काळात त्यांनाही पराभवांचा सामना करावा लागला. परंतु त्यांनी हतबल न होता जनसेवेचा घेतलेला वसा, त्यांचं समाजकार्य अधिक जोमाने व उमेदान सुरु ठेवलं. स्वच्छ, निर्मळ असं त्यांचं राजकारण. त्यांची जनतेशी असलेली जवळीक, आपुलकी आपल्याला त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून सदैव जाणवते. फक्त निवडणूक आहे म्हणून आश्वासन देण हा दादांचा स्वभाव नाही.

 त्यांनी जर एखाद आश्वासन जनतेला दिल तर ते पूर्ण करण्यासाठी दादा स्वतःला झोकून देऊन ते काम पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात व जोपर्यंत ते कार्य पूर्ण रुपाला जात नाही तोपर्यंत ते शांत बसत नाहीत. मतदार  संघातील जनतेवर, एखाद्या व्यक्तीवर दुःखद प्रसंग ओढवला तर स्वतः त्या ठिकाणी जाऊन आपुलकीने विचारपूस करतात आणि शक्य होईल तितकी मदत करतात यातून त्यांची जनतेसाठी असलेली आत्मीयता आणि जवळीकता दिसून येते. 


अनेक अशिक्षित आणि सुशिक्षित लोकांना त्यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. बँक, शाळा, महाविद्यालये, औदयोगिक संस्था, ग्राहक भांडार या सर्व सुरु करण्यामागे दादाचा एकच प्रामाणिक उद्देश होता तो म्हणजे माझ्या मतदार संघातील प्रत्येक व्यक्ती सुशिक्षित, आत्मनिर्भर, आनंदी, व सुखी झाली पाहिजे. दादाला या प्रत्येक कार्यात खंबीरपणे साथ दिली त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या वाहिनीसाहेब. दादांनेही वाहिनी जे काय करतील त्याला विरोध न करता पाठिंबा दिला, कौतुक केल यातूनच त्यांचं स्त्री-पुरुष समानता दिसून येते.

नावाप्रमाणेच प्रकाशमय त्यांचे विचार, त्यांच्यामुळेच होतंय जाणसामान्यांचे स्वप्न साकार,

त्यांच्या प्रेरणेनेच मिळतोय जनसामान्यांच्या जीवनाला आधार.

असे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय दादा यांचे कार्य आहे महान. त्यांच्याबद्दल कितीही लिहलं तरी कमीच पडेल असं ओळीत, पानात, पुस्तकात न मावणार असे आहे दादांचं अस्तित्व. शेवटी ईश्वरचरणी मी एकच प्रार्थना करते कि दादांना दीर्घायुष्य लाभावे. आणि आम्हाला त्यांचा असाच सहवास मिळावा.


संगीता विनोद गांडगे (देंडगे )

शिक्षिका,सिंदफणा पब्लिक स्कूल, माजलगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या