*नावाप्रमाणेच प्रकाशमय त्यांचे विचार, त्यांच्यामुळेच होतंय जाणसामान्यांचे स्वप्न साकार*
💥💥👇💥💥💫
*https://aplaepaper.blogspot.com/2024/01/blog-post_79.html*
सुधीर मोघेंनी लिहिलेल्या या गीतातील हे शब्द म्हणजे मनुष्याच्या आयुष्याचे सार आहे. आज या सृष्टीतील प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील अंधाराचे जाळे दूर करण्यासाठी आणि प्रकाशात नाहून निघण्यासाठी धडपडत असतो. प्रत्येक व्यक्ती स्वतःला तिमिराकडून तेजाकडे नेण्याच्या प्रयत्नात आयुष्याचा प्रवास करत असते. परंतु त्याच जगणं हे स्वतःसाठी असत. आपल्या मराठवाड्याच्या भूमीत अशा अनेक कर्मतपस्वी व्यक्ती आहेत ज्यानी हजारो व्यक्तींना अज्ञानाच्या, अशिक्षेच्या, दारिद्र्याच्या अंधकारातून मुक्त करून त्यांच्या जीवनात उषःकाल आणला. चळवळीच्या या भूमीतील असेच एक कर्मवीर ज्यांनी आपल्या कार्याने हजारोंच्या आयुष्यातील अंधकार दूर करण्याचे काम केले ते म्हणजे आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र आणि माजलगाव तालुक्याचे भाग्यविधाते आमदार प्रकाश दादा सोळंके.
ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुका हा मराठवाड्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत शेती, सहकार, शिक्षण, आरोग्य आणि नव्याने विकसित होत असलेल्या औद्योगिक वसाहत या सर्वच दृष्टीने अग्रेसर असलेला हा तालुका. याचे कारण म्हणजे या तालुक्याला लाभलेले उच्चविद्याविभूषित नेतृत्व आणि त्या नेतृत्वात असलेली सेवावृत्ती. असे अष्टपैलू राजकीय नेतृत्व म्हणजे माननीय आमदार प्रकाश दादा सोळंके. दादांचा जन्म स्व.सुंदररावजी सोळंके आणि स्व. रत्नमालाबाई सोळंके यांच्या पोटी 14 जानेवारी 1954 रोजी त्यांच्या मामाच्या गावी अंबाजोगाई तालुक्यातील हातोला या गावी झाला. दादांचे चौथीपर्यंतचे शिक्षण देखील याच गावी झाले. नंतरचे सर्व शिक्षण पुणे आणि मुंबई या ठिकाणी झाले. दादांचे वडील स्व. सुंदर रावजी सोळंके हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना दादांचे शिक्षण पूर्ण होऊन दादा नोकरी करत होते. वडील एवढ्या मोठ्या पदावर असताना आपण नोकरी करावी हा विचारही कुणाच्या मनाला स्पर्श करणार नाही. वडिलांच्या पदाचा फायदा घेऊन आपले राजकीय बस्तान बसवण्याचा किंवा एखादे पद आपल्या पदरात पाडून घेण्याचा विचार दादांनी कधीही केला नाही.
परंतु आपल्या मराठवाड्याविषयी येथील जनतेविषयी नेहमीच त्यांच्या मनात एक ओढ होती आणि याच ओढीने दादांनी 90 च्या दशकात सहकारी साखर कारखाना उभारण्याचे प्रयत्न सुरू केले. हा काळ दादांच्या आयुष्यातील अत्यंत संघर्षाचा काळ होता कारण या काळात दादा कुठल्याही राजकीय पदावर नव्हते स्व. सुंदररावजी सोळंके साहेबांच्या आशीर्वादाने राजकारणात बस्तान बसवलेली अनेक मंडळी दादांच्या या कार्यात अडथळे आणत होती. ज्या काळात दादांनी कारखाना उभारणीचे काम केले तेव्हा अनेक समस्यांनी आपल्या या भागाला ग्रासलेले होते. त्यात मुख्य समस्या दळणवळणाची आणि कारखान्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळाची.
परंतु या सर्व अडचणीवर मात करून दादांनी 1991 साली सहकारी साखर कारखाना सुरू केला. दादांचे एक वैशिष्ट्य असे की कुठलीही संस्था सुरू करताना अगोदर त्याचा अभ्यास करणे आणि त्या क्षेत्राशी संबंधित तज्ञांचे मार्गदर्शन घेणे. निश्चितच कारखाना उभा करून दादा थांबले नाही तर शेतकऱ्यांनी उसाची शेती करताना कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथील तज्ञांच्या कार्यशाळा शेतकऱ्यासाठी आयोजित केल्या. दादांच्या उत्कृष्ट अशा कार्यशैलीमुळे आज हा कारखाना मराठवाड्यात नंबर एकला आहे. कुठलीही संस्था सुरू करणे सोपे परंतु ती यशस्वीरित्या चालवणे तिला कायम प्रगतीपथावर घेऊन जाणे हे मोठ्या जिकरीचे काम आहे.
परंतु दादांनी सुरू केलेली प्रत्येक संस्था आज उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे. मोठ्या निष्ठेने व सचोटीने कार्यरत राहताना परिपूर्णतेचा ध्यास कसा बाळगता येतो आणि उपलब्ध अवकाशात किती परिणामकारक काम करता येते हे दादांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध केले आहे. दादांनी उभा केलेल्या साखर कारखान्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक क्रांती झाली आणि हजारो लोकांना रोजगार मिळाला आणि इथूनच सुरुवात झाली ती प्रकाश पर्वाला.कारखान्यामुळे दादांचा ग्रामीण भागातील जनतेशी संपर्क वाढत होता आणि ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या काय आहेत याची जाणीव दादांना झाली तेव्हा त्यांनी कुठलेही राजकीय पद नसताना जनतेच्या या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.
अशातच 1991 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आणि दादा मोहखेड सर्कल मधून पंचायत समितीवर निवडून गेले आणि सभापती झाले.दादांच्या राजकीय जीवनातला सभापतीपदाचा कार्यकाल अत्यंत महत्त्वाचा कारण याच काळात तालुक्यातील तळागाळातील लोकापर्यंत दादा पोहोचले.दादांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सर्वसामान्य माणसाला असे वाटत होते की हीच व्यक्ती आपला आमदार असावी आणि म्हणून खास लोकाग्रहास्तव 1995 मध्ये विधानसभेची (अपक्ष) निवडणूक लढवली परंतु या निवडणुकीत थोड्याशा मताने दादांचा पराभव झाला.पराभवाचे कुठलेही शैल्य मनात न ठेवता दादा नव्या उत्साहाने आपले जनसेवेचे कार्य करत राहिले.कारखाना देखील आता चांगला नावारूपाला आला होता.यातच 1999 च्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि तालुक्यातील जनतेने दादांना प्रचंड मतांनी निवडून देऊन विधानसभेत पाठवले.त्यानंतर सुरू झालेली विकासाची गोड-दौड आजता गायत सुरू आहे.तीन दशकापेक्षा जास्त काळ झाला दादा आपल्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दिवस-रात्र परिश्रम करत आहेत.या 30- 35 वर्षात दादांनी तालुक्यातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला गोदावरी नदीवरील बंधारे,अनेक ठिकाणी सिंचन तलाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्पर कुंडलिका प्रकल्प हा दादांनीच पूर्णत्वास नेला.असं म्हणतात की भगीरथान गंगा पृथ्वीवर आणली परंतु या आधुनिक भगीरथानं ती प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात पोहोचवली.शेतकरी सदन झाला होता आता खरा प्रश्न होता शेतकऱ्यांच्या मुलाला उत्कृष्ट शिक्षण मिळण्याचा आणि त्यासाठी दादांनी 2002 मध्ये सिंदफणा पब्लिक स्कूल ची स्थापना केली. आज मराठवाड्यातील उत्कृष्ट इंग्रजी माध्यमाची शाळा असा नावलौकिक शाळेला मिळालेला आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी फिजिओथेरपी कॉलेज सुरू केले आणि मुलींसाठी नर्सिंग कॉलेज सुरू केले तसेच सुंदरराव सोळंके सहकारी पतसंस्था आणि माजलगाव सहकारी वस्त्रोद्योगाची सुरुवात केली.आपल्या भागातील जनतेला उत्कृष्ट वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून हॉस्पिटलचे काम देखील सुरू आहे आणि ते हॉस्पिटल लवकरच जनतेच्या सेवेत असेल.दादांच्या या संस्थेमुळे आज तालुक्यातील हजारो लोकांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि विकासाची पहाट झाली.
दादांचे आजचे नावलौकिक त्यांना सहजासहजी मिळालेले नाही त्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला.आपल्या राजकीय जीवनात त्यांनी अनेक जय पराजय पाहिले परंतु संयम कधी ढळू दिला नाही.दादा राजकारण करतात परंतु त्या राजकारणाला शालिनीतेची एक किनार आहे.माजलगावचे आमदार, महाराष्ट्र साखर संघाचे उपाध्यक्ष , मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशा उच्च पदावर काम करत असताना या नेतृत्वाचे पाय मात्र कायम जमिनीवर असतात .दादांचे काम खूप मोठे आहे ते असे एका लेखात सामावणारे नाही.आज दादांचा वाढदिवस म्हणून हा लेख प्रपंच.दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ईश्वरचरणी एकच प्रार्थना या सुसंस्कृत, सुजाण आणि हजारोंच्या आयुष्यातील अंधकार दूर करणाऱ्या या लोकनेत्यास महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी...
डॉ. वरूणराज तौर
8329848264
Social Plugin