Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

TOP MOSTI देशभर व्हायरल.. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीनी ती कविता पाहिली..

 

 

आपला ई पेपर परळी वैद्यनाथ 

 येत्या 22 जानेवारी रोजी अनेक तपांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा व प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची चर्चा देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर होत आहे.

 बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रात परळी तालुक्यातील वानटाकळी या गावच्या अवघ्या 26 वर्षीय तरुणाने  आपल्या एका कवितेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना भुरळ पाडली आहे. 

 अभिजीत बाळकृष्ण मुंडे असे या कवीचे पूर्ण नाव आहे. दोन नोव्हेंबर 1998 रोजी परळी वैजनाथ तालुक्यातील वानटाकळी या खेडेगावात जन्म झाला. त्याचे वडील पंधरा वर्षे एस आर पी एफ  म्हणून शासकीय सेवेत होते. सध्या ते महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. अभिजीत मुंडे यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अंबाजोगाई येथे .... झाले. तर उच्च शिक्षण जळगाव येथे पूर्ण झाले. त्याने बी टेक पदवी प्राप्त केली आहे.

 घरात कलाक्षेत्राचा कुठलाही वारसा नसताना त्याने हे क्षेत्र कसे निवडले असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला की  माझा मित्र मोहम्मद युनुस याने  उर्दू आणि हिंदी भाषा शिकवली. हळूहळू हिंदी आणि उर्दू भाषेची गोडी वाढत गेली. मी नजमा लिहित गेलो. त्या नजमा लोकांना आवडू लागल्या. पुढे मी दीर्घ स्वरूपाच्या कविता लिहू लागलो. हे करत असताना मीच लिहिलेल्या कविता यूट्यूब च्या माध्यमातून अभिनयासह सादर करू लागलो. या माझ्या प्रयत्नास रसिकांनी खूप मोठी साथ दिली. अभिजीतच्या यूट्यूब चैनल ला जवळपास तीन ते चार लाख फॉलोवर्स आहेत. मी लिहिलेल्या शंभूगाथा या प्रयत्नास रसिकांनी खूप मोठी साथ दिली. कर्ण या कवितेला सुद्धा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.

 अनेक दिवसापासून प्रभू श्रीरामाच्या बाबतीत होणारे राजकारण, प्रभू श्रीरामाच्या नावाने सुरू असलेला धार्मिक द्वेष, अशा अनेक घटनांमुळे मनात घालमेल होत होती. धर्माचा ठेका घेतलेल्या या लोकांना खरंच राम कितपत कळाला असावा असा प्रश्न पडला होता.  राम नेमका कसा आहे. तो आपण लोकांपुढे मांडावा असे ठरवले होते.

 योगायोगाने प्रभू श्रीराम जन्मभूमीत भव्य दिव्य सोहळा होणार आहे मग यापेक्षा दुसरा मोठा योगा योग असू शकत नाही. म्हणून मी प्रभू श्रीरामा वरती कविता लिहिली. ती हिंदी भाषेतून आणि माझ्या यूट्यूब चैनल वर अभिनयासह सादर केली. माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त ही कविता लोकांना आवडली. आणि ती कविता देशभर व्हायरल झाली. 

 या कवितेतील एक कडवे या कवितेचा पूर्ण सार सांगून जाते. ती अशी आहे" जबरदस्ती के जय श्रीराम मे सब कुछ है बस राम नही है"

 अभिजीत मुंडे यास विचारले की एवढ्या कमी वयात  प्रतिभा कशी मिळवलीस. त्यावर त्याने खूप समर्पक उत्तर दिले. तो म्हणाला मी ज्या संस्कारातून ज्या संप्रदायातून आलो आहे. त्या दृष्टीने मी खूप वृद्ध आहे.  मी वारकरी संप्रदायातुन आलो आहे.  या संप्रदायातील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून 21 व्या वर्षी समाधी घेतली होती.त्याच्या या उत्तराने मी निरुत्तर झालो. 

*खूशखबर..*.
*परळीच्या प्रवीण वाघमारे यांनी..*

*अयोध्येच्या राम जन्मोत्सवाच्या आयोजित कार्यक्रमात बीड जिल्ह्याचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले*
💥💥💥👇💥💥💫

*https://aplaepaper.blogspot.com/2024/01/blog-post_13.html*

*TOP MOST Video राम..देशभर व्हायरल..जबरदस्त कविता*
💥💥👇💥💥

*https://aplaepaper.blogspot.com/2024/01/youtube-video-player.html*

*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा हेडलाईन न्यूज*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*
*🎯👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*
 "कणभर तिळ मणभर प्रेम गुडाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या