Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बचपन स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न | उत्कृष्ट नृत्यांनी चिमुकल्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले

आपला ई पेपर परळी 


 

राजस्थानी पोदार लर्न स्कूल येथे दि.२२ शुक्रवार रोजी BACHPAN |बचपन स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.




विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे  शिक्षकच करतात. छोट्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासा सोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. चिमुकल्यां विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम बचपन स्कूलमध्ये सतत वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात यात पालकांचे मोलाचे योगदान असते असे मत बचपन स्कूलच्या प्राचार्या दिपा बाहेती यांनी यावेळी व्यक्त केले.

BACHPAN |बचपन स्कूलचे येथील राजस्थानी चॅरिटेबल पोदार लर्न स्कूल येथे शुक्रवारी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन सौ.स्वरूपाताई कुलकर्णी शाळेचे सचिव बद्रीनारायण बाहेती,सौ. प्रेमा बाहेती, राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे सहसचिव धिरज बाहेती ,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

BACHPAN |बचपन स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्री गणेशाच्या नृत्याने झाली. यावेळी चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. अभिनयासह अनेक गीतांवर उत्कृष्ट नृत्य करत या चिमुकल्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.  या वेळी शहरातील सर्व पालक व  प्रतिष्ठित व्यापारी आदी उपस्थित होते. अनेकांनी कौतुकास्पद शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. उपस्थित पालकांचे BACHPAN बचपन स्कूलचे सहसचिव धीरज बाहेती यांनी आभार मानले.


सहशिक्षिका दिपाली दहिफळे, वैशाली नरवाडकर, शैला लाड, सुरेखा मुंडे, संगीता वाघमारे, रेखा गुट्टे, मनिषा पाटील, प्राजक्ता कटके, प्रियंका ठोंबरे, शुभांगी आघाव आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

 सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील बालाजी आघाव यांनी केले.

*फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम दादा फडतरे यांची परळीत पोदार लर्न स्कूलला सदिच्छा भेट*
💥💥👇👇👇🔴🔴🔴

*https://aplaepaper.blogspot.com/2023/12/blog-post_72.html*

*पोदार अरेनाच्या जलतरणपटू आभा मुंडे,समिक्षा वेरूळे या सिंधुदुर्ग स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या ठरल्या..*
💥💥💥🔴👇👇
आपला ई पेपर
*https://aplaepaper.blogspot.com/2023/12/blog-post_29.html*

*परळी शहराच्या वैभवात भर ; हा उपक्रम कौतुकास्पद...*

*PARLI |आरेना हा केवळ स्विमींग पुल नव्हे तर..आनंदाचे क्षण अत्यंत निवांतपणे...अनुभवा*
💥🔴💥👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/parli_6.html*

*बुकिंग सुरू असून आजच संपर्क करा..*

*धिरज बाहेती*
*7499547340*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या