Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

RPLS फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम दादा फडतरे यांची परळीत पोदार लर्न स्कूलला सदिच्छा भेट

 आपला ई पेपर/परळी/ प्रतिनिधी

कळंब वालचंदनगर येथील फडतरे नॉलेज सिटी मधील कुस्तीचा थरार सदैव अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाचे आकर्षण ठरले असून या माध्यमातून कुस्तीपटूना प्रोत्साहन देणारे फडतरे नॉलेज सिटी चे संस्थेचे अध्यक्ष उत्तम दादा फडतरे यांनी परळीत राजस्थानीज पोदार लर्न स्कूलला सदिच्छा भेट दिली

फडतरे नॉलेज सिटी कळंब वालचंदनगर येथे एक आदर्श विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक संकुल , अनेक संकल्पना, आधुनिक सुविधा, उत्तम शैक्षणिक दर्जा आणि खेळास प्रोत्साहन देणारे केजी (सीबीएसई व एसएससी बोर्ड ) आयटीआय, पॉलीटेक्निक, जुनियर कॉलेज ,एमबीए असे अनेक पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणारा परिसरातील एकमेव कॅम्पस म्हणून ओळख असणारे फडतरे नॉलेज सिटी त्यांच्या या गौरवस्पद कार्यामुळे आज दि.‌ 23 शनिवार रोजी राजस्थानीज पोदार स्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष उत्तम दादा फडतरे, फडतरे नॉलेज सिटी फार्मसी विभागाचे प्राचार्य प्रवीण उत्तेकर संचालक राजू धारे  यांनी सदिच्छा भेट दिली असता त्यांचा








शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी सहसचिव धीरज बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद उपप्राचार्य लक्ष्मण पाटील , बंसल क्लासेस चे कैलास घुगे यांनीही त्यांचा सत्कार केला.

यावेळी पोदार स्कूल मधील कुस्तीपटू दीपक गीते यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा  फडतरे नॉलेज सिटी चे संस्थेचे अध्यक्ष उत्तम दादा फडतरे यांनी दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या