Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पोदार अरेनाच्या जलतरणपटू आभा मुंडे, समिक्षा वेरूळे या स्पर्धेत विजेत्या ठरल्या..

 

आपला ई पेपर /परळी 





परळीत पोदार स्विमींग आरेना या स्विमींग पुलचा परळी शहर व परिसरातील जलतरणपटू व आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी मोलाची मदत ठरत आहे. या स्विमींग येथे नियमित सराव करणाऱ्या परळीतील दोघींचा कोकणात झाला गौरव.सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना, मालवण नगरपरिषद आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने चिवला बीच मालवण येथे आयोजित 13 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा  रविवारी झाली.10 किलोमीटर खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत संजना जोशी (नागपूर) आणि यश जाधव (पालघर), परळीच्या आभा गणेश मुंडे (बीड) यांनी स्पर्धेत यश प्राप्त केले आहे. 



तर समीक्षा वैजनाथ वेरुळे  द्वितीय क्रमांकाचे बक्षीस यांनी प्राप्त केले.यांनी सुवर्णपदक प्राप्त करत स्पर्धेतील वेगवान जलतरणपटूचा बहुमान मिळवला आहे.

दोन दिवसीय स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी सकाळी मालवण चिवला बीच येथे झाला होता. राज्यभरातील 26 जिल्ह्यातील हजारो स्पर्धक सहभागी झाले. खुल्या स्पर्धेत 9 राज्यातील स्पर्धक सहभागी झाले. राज्य व जिल्हा सचिव राजेंद्र पालकर व सर्व सहकारी यांच्या उत्कृष्ट आयोजनात स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे सर्वांनीच कौतुक केले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण (दीपक) परब, उपाध्यक्ष बाबा परब, यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेतील विविध गटातील विजेत्यांना मेडल व अन्य पारितोषिक देत गौरवण्यात आले.

स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते

रवीवारी विविध गटातील स्पर्धा संपन्न झाली. दिव्यांग ग्रुप मुलेमुली 1 किमी विजेता रचित नरसिंघानी (कोल्हापूर), शरण्या कुंभार (बेळगाव), दिव्यांग ग्रुप 1 किमी साहिल जाधव (बेळगाव), आभा गणेश मुंडे (बीड), सुवर्णपदक, तर समीक्षा वैजनाथ वेरुळे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस यांनी प्राप्त केले.

या स्पर्धेत सहभागी होत स्वर्ण पदक प्राप्त केल्यामुळे पोदार स्विमिंग अरेनाचे धीरज बाहेती, प्रशिक्षक संजय भगत यांनी स्पर्धकांचे अभिनंदन केले. या स्पर्धेचे वाढत जाणारे स्वरूप पाहता सर्वोत्तम स्पर्धेत ही परळी सारख्या छोट्या गावांमधून स्पर्धक घडू शकतात . याचा निश्चितच अभिमान असल्याचे पोदार अरेनाचे धीरज बाहेती सांगितले.

स्पर्धेत मिळवलेल्या यशाचे सर्व श्रेय त्या दोघींची मेहनत व सराव आहे. सर्व सहकारी टीम आहे. स्थानिक जलतरणपटूनी अधिकाधिक सहभाग यापुढे स्पर्धेत नोंदवावा राज्य व देश पातळीवर नावलौकिक मिळवावा यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे पोदार स्विमिंग आरेनाचे प्रशिक्षक व टीमने यावेळी सांगितले. 

*परळी शहराच्या वैभवात भर ; हा उपक्रम कौतुकास्पद...*

*PARLI |आरेना हा केवळ स्विमींग पुल नव्हे तर..आनंदाचे क्षण अत्यंत निवांतपणे...अनुभवा*



*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/parli_6.html*

*बुकिंग सुरू असून आजच संपर्क करा..*

*धिरज बाहेती*


*परळी शहराच्या वैभवात भर ; हा उपक्रम कौतुकास्पद आहे

*https://aplaepaper.blogspot.com/2023/03/blog-post_14.html*    ,   

*🎯पोदार स्विमींग आरेना या स्विमींग पुलचा परळी शहर व परिसरातील सामान्य नागरिकांना या स्विमींग पुलचा लाभ घेता यावा*

*🎯या दृष्टीकोनातून शुल्क आकारणी करण्यात आली आहे*

*🎯रुपये 100 पासून 8 हजार रुपयांपर्यंत शुल्क*

*🎯प्रती तास 100 रुपये अशी सुरुवात असून*

*🎯मासिक जनरल स्विमींगसाठी रुपये 1500/-, त्रैमासिक-3500/- अर्धवार्षिक-6000/- महिनाभर पोहणे (प्रशिक्षकांसह) 2000/-, त्रैमासिक-4500/- आणि वार्षीक जनरल स्विमींग रु. 8000/- असे दर ठेवण्यात आले आहेत*



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या