Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महाराष्ट्र विद्यालयाचा क्रीडा क्षेत्रात ही डंका 6 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

 आपला ई पेपर/ परळी / प्रतिनिधी


शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील व ग्रामीण भागातील नावाजलेली संस्था असलेल्या महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 6 विद्यार्थिनींची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून निवड झालेले 6 विद्यार्थिनी हे राज्य पातळीवरील कबड्डी स्पर्धेत बीड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.

ग्रामीण भागातील सर्वात जुनी व नावाजलेली शिक्षण संस्था असलेल्या महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालय मोहा सातत्याने आपली गुणवत्ता सिद्ध करत असून एस.एस.सी, एच.एस.सी बोर्ड परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा यासह सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी शाळा,संस्था म्हणून सर्वदूर परिचित आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत शालेय विद्यार्थिनी यांनी नेत्रदीपक कामगिरी करत जिल्हा पातळीवर आपली छाप निर्माण केली. संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील किशोरी गटातून प्रियांका शिंदे,ज्ञानेश्वरी गोरे व प्रणाली नावंदे तर कुमारी गटातून किरण कुट्टे, कावेरी गवळी व सुप्रिया सोळंके या सहा विद्यार्थींनीची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.राज्यस्तरीय स्पर्धा ह्या नोव्हेंबर महिन्यात संपन्न होणार असून मोहा शाळेच्या विद्यार्थींनी ह्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राज्यस्तरावर करणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्याचे व त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक सुनील तारे,हनुमंत वाघमोडे, सुनील शिंदे यांचे संस्थेचे सचिव, सर्व संचालक मंडळ, शाळेचे प्राचार्य विनायक राजमाने, उपमुख्याध्यापक मुरलीधर बोराडे, पर्यवेक्षक सुरेंद्र हरदास आदींनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा....
*धक्कादायक एकाच बेडवर सातजणाचे मृतदेह...*

*आपला ई पेपर*
*👇👇👇👇*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_30.html*

*परळीत पोदार लर्न स्कूलमध्ये ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शन २०२३-२४ चे आयोजन*

👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/parli_28.html*

🎯👇👇👇👇👇
*Breaking |न्यूज_माझा*
*आपला ई पेपर_Online*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या