Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक घटना एकाच बेडवर सातजणाचे मृतदेह आढळून आले..

 आपला ई पेपर...

गुजरात सारख्या राज्यात व्यवसायातील अस्थिरता निर्माण होणं म्हणजे अपयश..



महाराष्ट्रातील शेकडो उद्योग गुजरातला  गेले असून राजकीय चर्चा मध्ये सतत या गोष्टीला विरोध होत असताना सुद्धा आजही गुजरात सारख्या राज्यात व्यवसायातील अस्थिरता निर्माण होणं म्हणजे अपयश आले अशी चर्चा ...कारण

गुजरातच्या सुरतमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका फ्लॅटमध्ये सात जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि मृतदेह ताब्यात घेतले...मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले असून पोलिसांनी सामूहिक आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे.

सुरतमधील अडाजन भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर कनुभाई सोळंकी यांचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये कनुभाई आपल्या कुटुंबासोबत राहात होते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी एक मृतदेह गळ्याला फास लागून लटकत होता. मनीष उर्फ शांतू सोलंकी अंसं त्याचं नाव असून कनुभाई यांचा तो मुलगा आहे. बाकीचे मृतदेह बेडवर पडलेले होते. त्यामध्ये कनुभाई , शोभनाबेन, रिटा, दिशा, काव्या आणि कुशल यांचा समावेश आहे.

शोभनाबेन कनुभाई यांच्या पत्नी आहेत. तर रिटा मनिषची पत्नी आहे. दिशा आणि काव्या मनीष च्या मुली आहेत. तर कुशल सगळ्यात लहान मुलगा आहे. या सर्वांचे मृतदेह बेडवर आढळून आले.

मनीष सोलंकी याचा फर्निचरचा व्यवसाय होता आणि आर्थिक अडचणीतून सामूहिक आत्यहत्येचं पाऊल उचलल्याची शक्यती आहे. कारण घटनास्थळी पोलिसांना एक चिट्ठी मिळाली असून तला मजकून त्यात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. शिवाय बाजूलाच एक रिकामी बाटली सापडली आहे. त्यात विष असल्याची शक्यता असून तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आली आहे.*

हेही वाचा..

आष्टी येथील तहसिलदार यांच्या गाडीला आग लावली की,आग लागली पोलिस तपास सुरू..*

*आपला ई पेपर

*👇👇👇👇*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_85.html*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या