Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED | परळीत पोदार लर्न स्कूल येथे ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शन २०२३ -२४ चे आयोजन


आपला ई पेपर|परळी प्रतिनिधी |Beed|


परळी गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती व राजस्थानीज पोदार लर्न स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने परळीत राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे सोमवार दि. ३०ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 

परळी गंगाखेड महामार्गावरील पोदार लर्न स्कूल येथे ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शन २०२३-२४

आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय अभियान उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, बीड जिल्ह्य उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, गटविकास अधिकारी संजय केंद्रे तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक परळी संभाजीनगर पो.स्टे. पोलिस निरीक्षक सलिम चाऊस, विशेष आमंत्रित डॉ.अरूण गुट्टे वैद्यकीय अधिक्षक परळी, श्रीमती हिना अन्सारी जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी परळी,एस. एन. बुक्तरे अधिक्षक अभियंता, औ.वि. केंद्र,परळी ,अमित बनकर उपमुख्य अभियंता, औ.वि. केंद्र, परळी, जयवर्धन सुर्यवंशी सहा.अभियंता, औ.वि. केंद्र, परळी, विष्णु जाधव डिस्कव्हरी सायन्स सेंटर प्रमुख, केरवाडी, श्रीराम कनाके गटशिक्षणाधिकारी, पं.स.परळी

डॉ.तुकाराम गुट्टे वैद्यकीय अधिकारी परळी,प्रा. डॉ. बी.व्ही. केंद्रे वैद्यनाथ महाविद्यालय, परळी आदींची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती कार्यक्रमाच्या संयोजक पोदार स्कूलचे प्राचार्य मंगेश काशिद तर शाळेच्या विज्ञान प्रमुख शिक्षिका भाग्यश्री गुट्टे यांनी दिली आहे.

५१ वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनास प्रमुख अतिथी अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे 

राजस्थानी पोदार लर्न स्कूल येथे दि. 30 ऑक्टोबर सोमवार रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीमध्ये हे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थी व सर्वांसाठी खुले राहणार आहे.

दि.१नोव्हेंबर रोजी दुपारी या विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचा समारोप होईल. विज्ञान प्रदर्शनामध्ये पर्यावरणासाठी जीवनशैली, आरोग्य आणि स्वच्छता, शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा विषय आहे. या विषयावर विद्यार्थी प्रतिकृती सादर करणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या