Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

|Railway |अ.भा. योजनेच्या शिलान्यास कार्यक्रमाचे नियोजन शून्य | परळीचे रेल्वे टेंशन चर्चेचा विषय राहणार

|Railway |

|Railway |परळीचे रेल्वे प्रशासन नियोजन शून्य|कार्यक्रमाचे नियोजन बारगळले 

आपला ई पेपर | parli |

|Railway |Indianrailways| |Amrutbharat|अमृत भारत योजनेच्या शिलान्यास कार्यक्रमाचे नियोजन पूर्णतःशून्य बारगळलेले दिसून आले. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा कुठेही नामोल्लेख नाही.महत्वाकांक्षी अमृत भारत स्टेशन योजनेच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज रविवार ६ ऑगस्ट २०२३ रोजी संपन्न झाला. मात्र, यात सर्व शिष्टाचार धाब्यावर बसवण्यात कोणतीही कसर रेल्वे प्रशासनाने सोडली नाही.

राज्यसभेच्या खा. रजनी पाटील आणि तब्बल २० लाख जनतेचे प्रतिनिधित्ववर ...अन्आपापल्या पदाचा कार्यकाळ संपलेल्या शिवकन्या शिरसाट (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बीड, त्यांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये समाप्त झाला) तसेच सरोजिनी हलगे (माजी नगराध्यक्ष परळी वैजनाथ, त्यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२१ मध्ये समाप्त झाला) यांच्या नंतर शिलान्यास फलकावर होते. विशेष म्हणजे माजी नगराध्यक्ष यांचा उल्लेख महापौर असा केलेला आहे.



चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित असणाऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमात हे घडल्याचे कसलेही वैषम्य रेल्वे प्रशासनास नाही.


कार्यकाळ संपलेल्या व्यक्तींच्या नावांना प्राधान्य देण्यात Railway |रेल्वे प्रशासनाने का धन्यता मानली असावी हे न उलगडणारे कोडे आहे.


यात एक बाब विशेष नमूद करायची आहे, फलकावर कोणाचे नावं कुठे असावे याची सर्वस्वी जबाबदारी ही Railway |रेल्वे प्रशासनाची असते. यात शिवकन्या शिरसाट व सरोजिनी हलगे यांची कोणतीही चूक नाही.


मुळात शिलान्यासमधील शिला म्हणजे दगडावर कोरीव काम करून मजकूर लिहिणे अपेक्षित असते पण इथे मात्र MDF वर व्हिनाईल प्रिंट केलेला तात्पुरता फलक लावून केवळ औपचारिक सोपस्कार पार पाडण्यात रेल्वे प्रशासनाने धन्यता मानली.


कार्यक्रम झाल्यावर फलक गायब झालेला होता. त्यामुळे त्याबाबत चौकशी केली असता स्टेशन मास्तरांनी बुकिंग विंडोला चौकशी करा असे उत्तर दिले तर बुकिंग विंडोला विचारणा केली असता स्टेशन मास्तरला विचारा असा फुटबॉल खेळ सुरू केला.


आता यावर Railway | रेल्वे प्रशासनाला याबाबत कोणला जाब विचारणार?

 असा सवाल परळीतील मुक्त पत्रकार अनिरुद्ध जोशी यांनी सोशल मीडियाच्या द्वारे आज रोजी केला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी यावर काय निर्णय घेतात व यापुढे 24 कोटी रुपयांचे होणारे विकास कामाचे जर 0 नियोजन राहिले तर परळीचे रेल्वे टेंशन चर्चेचा विषय राहणार का ? 

*जयपूर रेल्वेत मरण पावलेल्या निष्पापच्यां परिवारास आर्थिक मदतीची मागणी |कादर कुरेशी*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/mim.html*

*हो आताही live..परळी रेल्वे स्टेशन थेट Live...*
*https://aplaepaper.blogspot.com/p/youtube-video-player.html*

*हेडलाईन्स न्यूज...
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या