स्व.अशोकसेठ सामत यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमास उपस्थित रहावे|अश्विन मोगरकर
आपला ई पेपर |परळी वैजनाथ|
परळीचे शिल्पकार,माजी नगरअध्यक्ष,वैद्यनाथ बँकेचे माजी चेअरमन |स्व.अशोकसेठ सामत| यांच्या जयंतीनिमित्त उद्या सोमवार दि 7 ऑगस्ट रोजी श्री सावळाराम मंदिर, गणेशपार येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे.
परळीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या स्व.अशोकसेठ सामत यांची दि7 ऑगस्ट जयंती दिन आहे.
|स्व |अशोकसेठ सामत | यांनी नगराध्यक्ष म्हणून परळी लक्षणीय विकासकामे केली. परळीतील दि वैद्यनाथ अर्बन को ऑप बँकेत चेअरमन म्हणून बँकेचा विस्तार राज्यभर केला.अनेकांना वैद्यनाथ बँकेत नौकरी देऊन कुटुंबाना आधार दिला.बँकेच्या माध्यमातून गरजूंना पतपुरवठा करून अनेक व्यवसाय उभे करण्यास मदत केली. स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसोबत काम करत राजकारणासोबतच समाजसेवेचा ध्यास ठेवत परळीतील गरजूचे कायम आधार देण्याचे काम स्व अशोकसेठ सामत यांनी केले.
सोमवार दि 7 ऑगस्ट रोजी स्व. अशोक सेठ सामत यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त श्री सावळाराम मंदिर, गणेशपार येथे सकाळी 9.30 वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी स्व. अशोक सेठ सामत यांच्या सोबत विविध क्षेत्रात काम केलेले अनेक सन्माननीय व्यक्ती त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अश्विन मोगरकर, मुकेश पाटील व विजय जोशी यांनी केले आहे.
ब्रेकिंग न्यूज
*थेट..Live परळी-बीड या* *रेल्वेचेही स्वप्न लवकरच साकार*होणार|खा. प्रीतम ताई मुंडे*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_6.html*
*live..परळी रेल्वे स्टेशन थेट Live...*
*https://aplaepaper.blogspot.com/p/youtube-video-player.html*
*हेडलाईन्स न्यूज...
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*
Social Plugin