Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आपले कर्तव्य आहे... एक चित्र...हजारो लाखो शब्दांपेक्षा सरस असतं कसे तर...

आपले कर्तव्य आहे...एक चित्र...हजारो लाखो शब्दांपेक्षा सरस असतं कसे तर...



परळी फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्षपदी गोपाळ मोदाणी तर उपाध्यक्ष बाजीराव राठोड व
सचिव मोहन तिडके यांची निवड झाल्याबद्दल परळीत सुयोग कलर लॅब या ठिकाणी त्यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी सुयोग कलर लॅबचे रवी वळसे, सुनील फुलारी... क्षितिज वळसे व मित्रपरिवारां वतीने सत्कार करताना छायाचित्र दिसत आहेत....

छायाचित्रे ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा अनमोल ठेवा आहे. अविस्मरणीय क्षणांना छायाचित्रामध्ये कैद करून ठेवणे ही पण एक कला आहे. 


कल्पक छायाचित्रकार साधे दिसत असलेले दृश्यही बोलके करतो. 

उत्साह, आनंद, उधाण, धमाल, वेदना, दुःख अशी प्रत्येक भावना एका क्लिकमध्ये टिपण्याचं सामर्थ्य असणाऱ्या सर्व छायाचित्रकारांना 📸 जागतिक छायाचित्रण दिनी मनःपूर्वक शुभेच्छा... 

#जागतिक_छायाचित्रण_दिवस #हार्दिक #शुभेच्छा 

#Worldphotographyday #Hardik #Shubhechha  *santosh bartakke*

असं म्हणतात एक चित्र हजारो, लाखो शब्दांपेक्षा सरस असतं. चित्र प्रकारात पेंटिंग, व्यंगचित्र, छायाचित्र असे वेगवेगळे प्रकार आहेत. सगळे आपापल्या परीने तितकेच ताकदवान आहेत. थोडक्यात आपल्या भावनांना आणि आजूबाजूच्या परिसराला नेमकेपणाने त्याच्या नजरेतून टिपणारा एक जादूगार म्हणजे छायाचित्रकार.

आजही मी जेव्हा माझ्या घरी असलेला अल्बम उघडतो तेव्हा तो काळ नजरेसमोर वेगवेगळ्या भावभावनांना सोबत घेऊन एक भावविश्व उभे करतो. सर्व प्रथम माझे ज्यांनी ज्यांनी आजवर छायाचित्रे काढले असतील त्या ज्ञात अज्ञात मंडळींना त्या अनमोल ठेव्यासाठी प्रणाम व धन्यवाद.


व्यंगचित्रांचा प्रभावी वापर करून शिवसेना नावाचा अंगार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जन्माला घातला. तितकीच ताकद छायाचित्रात असते. हिरोशिमा नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याने झालेले जागतिक परिणाम विषद करायला एकचं छायाचित्र पुरेसं होतं.


वेगवेगळ्या आंदोलनात एक क्षण असा असतो जो कॅपचर करायला अख्ख आयुष्य पणाला लावणारे छायाचित्रकार होऊन गेले. खासकरून वाईल्ड लाईफ फोटोग्राफर तर कमालीचे धाडसी आणि तितकेच संयमी म्हणावे लागतील.


आजच्या काळात मोबाईल क्रांतीने फोटोग्राफर मंडळी अडचणीत आहेत. पण, त्याचवेळी प्री वेडिंग शूट सारखे नवीन प्रकार जन्माला येत आहेत ज्यामुळे फोटोग्राफर कसेबसे तग धरुन आहेत.


एक खंत आज फोटोग्राफी व्यवसायात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे मांडावी वाटते. उदाहरणादाखल सांगायचे तर एखाद्या राजकीय कार्यक्रमासाठी फोटोग्राफर त्या व्यक्तीच्या यंत्रणेने बुक केला तर ती यंत्रणा त्या फोटोग्राफरला कधी पैसे देईल याची निश्चिती नसते कारण ते लोक प्रिंट्स घेतच नाहीत आणि बातम्यांसाठी तत्काळ डिजिटल प्रिंट मागवून घेतात. मग फोटोग्राफरला त्याच्या हक्काच्या पैश्यासाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करावा लागतो. दरम्याम अवहेलना, मनस्ताप सहन करत पोटासाठी त्यांच्याच नवीन ऑर्डरस स्वीकाराव्या लागतात.


सोबतच त्या राजकीय व्यक्तीचे चेलेचपाटे आपला फोटो त्यांच्या साहेबासोबत आला असावा म्हणूण त्या छायाचित्रकाराला फोन करून भांडवून सोडतात. इतकंच नाही तर त्या फोटोत हा का आला? तो का आला नाही? म्हणून तंडत असतात. विशेष म्हणजे या महाभागांना डिजिटल प्रिंट फुकटात हव्या असतात. यापुढे त्या फोटोग्राफरमे फोटो प्रिंट देऊनही ते कानफुंके लोक्स नेते मंडळींना सांगत असतात 'साहेब, आपल्यामुळे तो आहे तरी तो आम्हांला फोटो देत नाहीत, मी माझ्या ओळखीचा फोटोग्राफर आणतो'.


हे फक्त राजकीय उदाहरण दिले, असे कमी अधिक प्रमाणात प्रत्येक क्षेत्रात होत असते. लग्न समारंभात ऑर्डर देणारी व्यक्ती अमक्या आत्याचा, तमक्या मामाचा फोटो आला नाही म्हणून तंडत बसते. बरं तुम्हांला काय अपेक्षित आहे हे ऑर्डर देणाऱ्यालाही ठाऊक नसतं.


थोडक्यात तुमच्या आमच्या भावभावनांना अपार मेहनतीने मोठेपणा प्राप्त करून देणाऱ्या छायाचित्रकारांना वेळेवर योग्य तो ठरलेला मोबदला देऊन सन्मान देणे हे आपले कर्तव्य आहे असे मला आज जागतिक छायाचित्र दिनानिमित्त सांगावेसे वाटते.

*राज्यातील हजारो तरुण - तरुणींना मिळणार नोकरी*

*स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या जयंतीनिमित्त भव्य नोकरी महोत्सव*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_70.html*

*स्वर्गीय मोहनलालजी बियाणी यांच्या जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर..
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_8.html*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


सोबतच्या छायाचित्र जोडलेल्या व त्यात नसलेल्या माझ्या परळी वैजनाथमधील तसेच सर्व ठिकाणच्या ऊन, पाऊस, थंडीत काम करणाऱ्या सर्व छायाचित्रकार मंडळींना मनःपूर्वक शुभेच्छा.


जय हिंद,

जोशींचीतासिका

अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ

चलभाष क्र. 8983555657


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या