Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लक्ष्मीबाई देशमुख महाविद्यालयान गृहविज्ञान विभागातर्फे कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न

आपला ई पेपर |परळी |प्रतिनिधी


'नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरे जाताना त्या अनुषंगाने " कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन गृहविज्ञान विभागातर्फे नुकतेच करण्यात आले होते. यास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, प्रमुख पाहुणे संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विद्याताई देशपांडे उपस्थित होत्या. याकार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कपील वाघमारे उपस्थित होते. वाघमारे यांनी चॉकलेटचे विविध प्रकार विद्यार्थिनींना शिकवले. 

या कौशल्याचा उपयोग व्यवसाय म्हणून कसा करावा यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले. 

या प्रसंगी विभागप्रमुख डॉ.पाध्ये यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका छाया देशमुख,प्रा.जोशी, प्रा.यल्लावाड, कल्याणी पत्की उपस्थित होत्या. विद्यार्थिनींनीच उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या