Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आरोपी अटक|गोळीबार प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज तपास सुरू

 


आपला ई पेपर |संभाजीनगर|

उधारिचे साडेसात हजार रुपये मागितल्याने तरुणाला भररस्त्यात गोळी झाडली. यात एका आणखी तरुणाला गंभीर जखम झाल्याचे समोर येत आहे. या हल्लेत एकातरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत तरुणाचे 11 दिवसांनी लग्न होणार होते. संभाजीनगरच्या बायजीपूर भागात ही घटना घडली.

लग्नाच्या तयारी साठी उधारीचे पैसे मागितल्याने हत्या करण्यात आली. हमद अब्दुल्लाह सालेह कुतुब चाऊस (वय 24 वर्षे) असं मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फय्याज पटेल (वय 27 वर्षे) असं गोळी झाडणाऱ्या आरोपीचे नाव आहे. २० ऑगस्ट रोजी हमदचे लग्न होणार होते. त्यासाठी तो तयारी करत होता. तयारीसाठी उधारीचे पैसे मागण्यासाठी त्याने काही दिवसांपुर्वी फय्यादकडे विनवणी केली. त्याने पैसे न देता त्याची हत्या केली. हमद आणि त्याची आई हे दोघेंही शहरात राहत होते.


फय्यादने मौका बघून हमदवर हल्ला केला. पहिली गोळी हमदवर झाडताना नेम चुकला आणि जवळील एका स्टोर मधील एका व्यक्तीच्या हाताला लागली. त्यानंतर हमदवर दुसरी गोळी झाडली आणि ती थेट छातीला लागली. आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसर हादरले आहे. शहरात पुन्हा नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न उभा राहिला आहे.

सदरील घटनेतील आरोपीला पोलिसांनी आठ तासात ताब्यात घेतली आहे.


*बीडचा होतो बिहार...|*
*भररस्त्यात ...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/beed.html*

*मोठी.. ब्रेकिंग
*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या