Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED |बीडचा होतोय बिहार...|भररस्त्यात प्रतिष्ठित व्यापाऱ्याची हत्या...

परळीच्या कनेरवाडी घाटात गोळीबार.. आरोपी फरार

आपला ई पेपर

परळी शहरापासून जवळच असलेल्या कन्हेरवाडी घाटातील सुरेश फड यांचे यशराज हॉटेल आहे.जे विलास आघाव हे मागील एक वर्षांपासून चालवतात. काल राञी दरम्यान या ठिकाणी रात्री एक वाजण्याच्या सुमारास चारजण चहा पिण्यासाठी आले. 


त्यांनी हॉटेलमधील वेटरकडे सिगारेटचे पाकीट मागितले..वेटरने सिगारेटचे पाकीट आणले मात्र सिगारेटचे पाकीट महाग का दिले? असं म्हणत ग्राहकांनी हुज्जत घालायला सुरुवात केली.बाचाबाची आणि वादावादी एवढी वाढली की प्रकरण मारहाणीपर्यंत गेले.


ग्राहकांपैकी एकाने स्वतःकडील पिस्तूलातून हवेत एक राउंड फायर केला.गोळीबाराचा आवाज ऐकून नोकरांनी हॉटेलचे शटर लावून घेतले.त्यामुळे संतापलेल्या या लोकांनी शटरवर दोन राउंड फायर केले. नशिबाने यात कुठलीही हानी झाल्याचे समजत नाही परंतु सदरील घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून अशा घटनेने कायदा व सुव्यवस्था यांच्यावर विश्वास दिवसेंदिवस उडत आहे.

दोन महिन्या खालीच घडलेली घटना

आपला ई पेपर धारुर


धारूर येथे सराफा व्यापाऱ्याचा खून झाल्याची घटना धारूर येथील तेलगाव रोडवर विजय बिअर बार येथे आज रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारेस घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला. 

धारूर येथील तेलगाव रोड लगत विजय बियरबार आहे. या ठिकाणी धारूर येथील नितीन मोहन धोत्रे वय 40 वर्षे व इतर काही जणांमध्ये रविवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास भांडण झाले. या भांडणांमध्ये नितीन धोत्रे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. 

भर रस्त्यावर झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे धारूर शहरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळतच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. नितीन धोत्रे यांची धारूर शहरात सराफा दुकान आहे. या प्रकरणांमध्ये नातेवाईकांनी पोलीसात धाव घेवून आरोपीस अटक करण्याची मागणी केली होती. 

पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. खुनाबद्दल मात्र नेमके कारण समजू शकले नाही. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. अटोळे यांना विचारणा केली असता एकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले


*धक्कादायक | परळी शहरात एकाची हत्या... पोलीस तपास सुरू*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_60.html*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


*परळीत चक्क पहाटेच अवैद्य धंदे सुरू | रेल्वे स्टेशन बस स्टँड परिसरात बिंगोचा धुमाकूळ*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/parli.html*

.*परळीत खुनाचा गुन्हा दाखल आरोपी मयत बंडू मुंडे यांची इनोव्हा कारसह फरार...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_2.html*

*मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज...*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/04/blog-post_20.html*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या