Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PODAR | परळीत पोदार लर्न स्कूल येथे धाडसी कवायतीतून जगण्यासाठी कलाकारांची ‘सर्कस’


सर्कशीचे खेळ बंद झाल्याने उपासमारीची वेळ...

आपला ई पेपर | परळी


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आज दि 1 ऑगस्ट रोजी PODAR |पोदार स्कूलमध्ये विविध कार्यक्रमाचा आयोजन केले होते.

मागील काही वर्षांपासून प्रेक्षकांनी सर्कसकडे पाठ फिरवल्याने सर्कसचा व्यवसाय डबघाईला आले आहेत.सर्कसमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे सर्कसमधील कलाकार आणि कर्मचाऱ्यांची एकंदरीत परिस्थितीचा विचार करता आज PODAR| राजस्थानी पोदार लर्न स्कूल येथे या कलाकाराच्या कलेतून विद्यार्थ्यांचे मनोरंजन व त्या कलाकाराला यातून थोडेसे आर्थिक मानधन हा उद्देश ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आहे.

सध्या सोशल मीडियाचा धावते युग असल्यामुळे मोबाईल वरील इंटरनेट द्वारे अनेक खेळ व मनोरंजनात्मक कार्यक्रमांना आलीकडे जास्त प्राधान्य दिले जाते आहे. त्यामुळे सर्कस सारख्या मनोरंजन करणाऱ्या गोष्टीकडे अनेकांचे दुर्लक्ष झाले आहे.

सध्या व्यवसायही म्हणून सर्कसचे खेळ बंद झाले आहेत. त्यामुळे सर्कसमध्ये काम करणारे कामगार आपापल्या गावी निघून गेले आहेत. ते आपआपल्या गावाजवळील छोट्या मोठ्या शाळेमध्ये जाऊन आपली कला सादर करून उदरनिर्वाह करत आहेत. 

अशाच प्रकारचे मनोरंजनात्मक कवायतीतून धाडसी खेळ करत जगण्यासाठी जीवनाची सर्कस करणाऱ्या या कलाकारांच्या भावना लक्षात घेऊन व एक मदतीचा हात म्हणून आज राजस्थानी चॅरिटेबल पोदार लर्न स्कूलमध्ये या खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी PODAR | राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी,सचीव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते अशी माहिती सहसचिव धीरज बाहेती,यांनी दिली आहे.


*PODAR |पोदार लर्न स्कूल येथे डोळ्यांचे आरोग्य आणि काळजी डॉ.झंवर यांनी केले विशेष मार्गदर्शन*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/podar.html*

*PODAR | राजस्थानी पोदार लर्न स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा एक तास चौफेर वाचनासाठी  | विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग...*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_27.html*

*मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या