आपला ई पेपर
परळी येथे भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित "सत्कार गुणवंतांचा, सन्मान सामाजिक कार्याचा, आधार गरजवंतांचा" या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना प्रसिद्ध शिक्षण तज्ञ श्री महेश पाटील यांनी वरील उद्गार काढले. मराठवाड्यातील विद्यार्थी फक्त मेडिकल व इंजिनिअरिंगच्या मागे लागले आहेत, मेडिकल मध्ये प्रवेश परीक्षेत पात्र होणाऱ्या किंवा गव्हर्मेंट कॉलेजला लागणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्या ऐवजी विद्यार्थ्यांनी करिअरचे इतर मार्ग पण विचारात घ्यावेत, आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात झोकुन देऊन काम केल्यास नक्कीच करिअर घडते असे ते म्हणाले.
भावसार युवा सेवाभावी संस्था दरवर्षी गुणवंतांचा सत्कार आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करते. यावर्षी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध शिक्षणतज्ञ श्री. महेश पाटील हे उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
याच कार्यक्रमात "सन्मान सामाजिक कार्याचा" या संकल्पने अंतर्गत परळी येथील आर्य समाज संचलित स्वामी श्रद्धानंद गुरुकुल या संस्थेचा विशेष सन्मान करण्यात आला.
हा सन्मान स्वीकारण्यासाठी गुरुकुलातील आचार्य सत्येंद्रजी आर्य, सोममुनी वानप्रस्थी, डॉक्टर मधुसूदन काळे, श्री हुलगुंडे सर, श्री कावरे साहेब, प्राचार्य वीरेंद्रकुमार शास्त्री, प्राध्यापक नयनकुमार विशारद, श्री तिवार सर, डॉक्टर विश्वास भायेकर आणि गुरुकुलात शिक्षण घेणारे विद्यार्थी उपस्थित होते. शाल वृक्षाचे रोप आणि सन्मानपत्र असे या सन्मानाचे स्वरूप होते. सत्कारास उत्तर देताना श्री सोममुनी वान यांनी आर्य समाज आणि गुरुकुलाचे महत्त्व व कार्य विशद केले. तत्पूर्वी पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ देवल कमिटीच्या सचिव पदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापक बाबासाहेब वामनराव देशमुख यांचाही विशेष सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व भावसार युवा सेवाभावी
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. "आधार गरजवंतांचा" या संकल्पने अंतर्गत सौ. सुनीता केशव वायचळे यांना भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या वतीने शिलाई मशीन देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावसार समाजाचे बीड जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाशराव कानगावकर हे होते, तर भावसार समाजाचे बीड तालुका अध्यक्ष श्री अनिल सुत्रे यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमास लाभली होती.यावेळी व्यासपीठावर परळी भावसार समाजाचे अध्यक्ष श्री. प्रभाकर हजारे व भावसार युवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. मनोज वायचळे आणि भावसार महिला समाज अध्यक्षा सौ. प्रणिताताई हंबीरे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बीड जिल्हाभरातून भावसार समाजाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी येथील प्रसिद्ध व्यापारी श्री बंडूशेठ गरुड यांनी आपले श्रद्धा मंगल कार्यालय नि:शुल्क उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना भावसार युवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. मनोज वायचळे यांनी तर आभार प्रदर्शन सचिव श्री शैलेश वैजवाडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय सुरवसे सर, तानाजी देशमुख यांनी केले तर
कार्यक्रमाच्या शेवटी श्री संजय सुरवसे यांनी पसायदान गायले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भावसार युवा सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
*परळीत पोलीस पंचनामा सुरू |गुत्तेदार मुंडे राहणार कन्हेरवाडी यांचा खून ?*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post.html*
*Join the Whatsup*
👇👇👇
https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr
*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*
*9423472426*
Social Plugin