Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत कृषीमहर्षी वसंतराव नाईक यांची जयंती मनसेतर्फे साजरी

 आपला ई पेपरपरळी


 हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या नेतृत्वाखाली "शिवतीर्थ" मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय अरूणोदय मार्केट येथे साजरी करण्यात आली.

मनसेच्या "शिवतीर्थ" कार्यालयात स्व.वसंतराव नाईकांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. त्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे तथा वक्ते म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव तसेच संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करून उपस्थित मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले


   तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परळी शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी लाहान मुलांना वसंतराव नाईक कोण आहेत त्यांना हरीत क्रांतीचे जनक म्हणून का संबोधले जाते या बदल समजावून सांगितल व सेवकराम जाधव सर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छां देण्यात आल्या.

   या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर,शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर,ता.उपाध्यक्ष विठ्ठल दादा झिलमेवाड, गणेश राठोड,शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे, शहर उपाध्यक्ष महेश शिवगण,अनंत सोळंके,प्रदीप राठोड, विजय राठोड, करण चव्हाण,अनिल चव्हाण, पांडुरंग मोरे, व्यंकटेश बदाले, आदी मान्यवर उपस्थित होते.

*श्रीक्षेत्र परळी वै येथे प्रथमच श्री नर्मदा पुराण कथा हा संगीतमय कथा कार्यक्रम होणार...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_44.html*

*परळीत पोलीस पंचनामा सुरू |गुत्तेदार मुंडे राहणार कन्हेरवाडी‌ यांचा खून ?*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post.html*

*Join the Whatsup*
👇👇👇
https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या