Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पोदार लर्न स्कूलच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’ च्या निमित्ताने सर्व डॉक्टर्सना दिले शुभेच्छापञ...



आपला ई पेपर   परळी | प्रतिनिधी 

डॉक्टर म्हटलं की जीवन आणि मृत्यू या दोन्ही गोष्टींचा उल्लेख होता.संकट समयी देवदूतासमान भासणाऱ्या, आपल्या कौशल्याने रुग्णांना जीवदान मिळवुन देणाऱ्या, समर्पित भावनेने नि:स्वार्थीपणे अविरत सेवेत रुजु सर्व डॉक्टर्सना ‘डॉक्टर्स डे’ च्या निमित्ताने आज प्रत्येक रुग्णालयात जाऊन राजस्थानीज पोदार स्कूलच्या वतीने डॉक्टरांच्या घरी जाऊन प्रत्यक्षपणे शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शाळेच्या शिक्षिका सौ.निता बळवंत मॅडम ज्ञानेश्वर गुट्टेसर , शिक्षिका ज्योती शर्मा, बालाजी आघाव सर,राहुल बचाटे सरृ, शिक्षिका पूनम मुंडे आदींनी प्रत्यक्षपणे जाऊन भेटी दिल्या..


बिधानचंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला. एवढेच नाही तर 1 जुलै 1962 रोजी डॉ. बिधानचंद्र यांचे निधन झाले. या कारणास्तव त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली त्या निमित्ताने सर्वत्र डॉक्टर डे साजरा केला जातो.


जगातील विविध देशांकडून डॉक्टरांचा दिवस वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. भारतातील महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त भारतात दरवर्षी १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. ज्यांनी आपल्या गरजेच्या वेळी निःस्वार्थपणे आपल्याला मदत केली आणि रूग्णाच्या आरोग्यासाठी अथक परिश्रम केले, अशा सर्व डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.


या अनुषंगाने अध्यक्ष श्री.चंदूलाल बियाणी, सचीव श्री.बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती,कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव श्री.धीरज बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर श्री.बी.पी.सिंग, बचपन क्युरियस कीड्सच्या प्राचार्या सौ.दीपा बाहेती,प्राचार्य श्री. मंगेश काशीद , उपप्राचार्य श्री.लक्ष्मण पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रत्यक्षपणे घरी जाऊन शुभेच्छा देण्यात आल्या...  


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष नियोजन करून परिश्रम घेतले.

















*Live video हो आताही पहा..स्पेशल यशोगाथा*

*परळीच्या भूमीकन्या बंसल क्लासेस महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा पूजा बियाणी- राठी*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_82.html*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*





































































राष्ट्रीय डॉक्टर दिनाचा इतिहास आणि महत्त्व

डॉ. बिधानचंद्र रॉय यांचे योगदान ओळखले जावे या उद्देशाने भारत सरकारने १९९१ मध्ये डॉक्टर दिन साजरा करण्यासंदर्भातील निर्णय घेतला.. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या स्थापनेत डॉ. बिधानचंद्र रॉय यांनी  महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या देशाच्या प्रगतीमध्ये डॉक्टरांच्या भूमिकेला अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या