Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

FIT INDIA | क्विज राज्यस्तरीय अंतिम फेरीसाठी सिंदफणा पब्लिक स्कूलची निवड

 आपला ई पेपरमाजलगाव 


येथील विद्याभवन शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिंदफणा पब्लिक स्कूल ची राज्यस्तरीय फिट इंडिया क्विजच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. याबद्दल शाळेवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रश्नमंजुषाच्या अंतिम फेरीसाठी शाळेतील दहावीचा विद्यार्थी अलेक रेदासानी तर नववीच्या  समरेश देशमुख या विद्यार्थ्याची निवड झाली.

सविस्तर वृत्त असे की, फिटनेस हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याच्या उद्देशाने माननीय पंतप्रधानांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी FIT INDIA चळवळ सुरू केली. 'स्टार्ट द यंग' या  नियमाचे पालन करून निरोगी आणि आनंदी जीवनासाठी तंदुरुस्ती आणि चांगले आरोग्य हातात हात घालून चालते. त्यामुळे शालेय मुलांसाठी फिटनेस आणि क्रीडा यांवर देशव्यापी स्तरावर ‘फिट इंडिया क्विझ’ सुरू झाली. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना फिटनेस आणि खेळाविषयीचे त्यांचे ज्ञान प्रदर्शित करण्यासाठी एक मंच उपलब्ध झाला आहे. 

 

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेल्या फिट इंडिया क्विझ मध्ये 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 360 शाळांमधील विद्यार्थ्यांना राज्य फेरीसाठी शॉर्ट लिस्ट करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र उपांत्य फेरी चार गटांमध्ये घेण्यात आली. पहिल्या गटातून सिंदफणा पब्लिक स्कूलने १५० गुण मिळवून आपले स्थान अंतिम फेरीसाठी निश्चित केले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे सहाय्यक संचालक, श्रीनिवास मळेकर हे उपस्थित होते.  


यावेळी बोलताना मळेकर म्हणाले की, माजलगाव सारख्या ग्रामीण भागातून सिंदफणा पब्लिक स्कूल ची राज्यस्तरीय अंतिम फेरीसाठी निवड होणे, ही बाब कौतुकास्पद आहे. त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. मुंबई येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ट्विटर अकाऊंट वरून सिंदफणा पब्लिक स्कूल ला शुभेच्छा दिल्या. 

या स्पर्धेच्या तयारीसाठी शाळेचे क्रीडा संचालक दीपक माने, क्रीडा शिक्षक पुरुषोत्तम सोळंके, सचिन मंजुळे व क्रीडा शिक्षिका वैशाली सोळंके यांनी परिश्रम घेतले. या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, शाळेच्या सचिव मंगल सोळंके, समन्वयक नीला देशमुख, प्राचार्य अन्वर शेख, उपप्राचार्य राहुल कदम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


*BSF | PARLI वडार समाजाची लेक भारतीय सैन्य दलात मध्ये भरती |अभूतपूर्व स्वागत*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/bsf-parli.html*
*आभारी आहे...! शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...*

*मोदीनी राष्ट्रवादी भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष असल्याचं म्हटलं होते आज आभारी आहे*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_39.html*

*परळीत खुनाचा गुन्हा दाखल आरोपी मयत बंडू मुंडे यांची इनोव्हा कारसह फरार...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_2.html*

*मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज...*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/04/blog-post_20.html*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या