Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BSF | PARLI वडार समाजाची लेक भारतीय सैन्य दलात मध्ये भरती |अभूतपूर्व स्वागत

महत्वकांक्षा, जिद्द,चिकाटी असेल तर काही ही शक्य आहे

● पहिली लेक सैन्य दलात भरती

समाज बांधवाकडून अभूतपूर्व स्वागत


परळी / प्रतिनिधी

महत्वकांक्षा, जिद्द,चिकाटी असेल तर काही ही शक्य आहे हे परळी शहरातील वडार कॉलनी येथील वडार सामान्य कुटुंबातील निकिता अण्णासाहेब धोत्रे या मुलीने सिद्ध करून दाखवले आहे. चार बहीण-भावंड असलेल्या घरात सर्वात मोठी असलेल्या निकिताने आपल्या परंपरागत व्यवसाय करण्याचा नाही हे बालमनातच ठरवून बालपाणी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार करत देशाची सेवा करण्याचे भाग्य तिला लाभले आहे.भारतीय तट रक्षक दलात निवड होऊन पश्चिम बंगाल मध्ये प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून ती परळी येथे आली असता समाज बांधवांनी तिचा अभूतपूर्व असे स्वागत करीत तिचे अभिनंदन केले. शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या वडार समाजातील मुलींनी शिक्षण घेऊन पुढे येण्याचे आवाहन याप्रसंगी निकिताने केले.

वडार समाज हा मूलतः खडी फोडणारा,मोलमजुरी करून उपजीविका करणारा समाज म्हणून ओळखला जातो.शिक्षण, नोकरी या सर्व गोष्टी समाजापासून आज ही कोसो दूर आहेत.या सर्व विदारक परिस्थितीत परळी शहरातील

वडार कॉलनी येथील अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या निकिता अण्णासाहेब धोत्रे ही मुलगी ही केवळ महत्वकांक्षा, जिद्द, चिकाटी आणि शिक्षण या सर्वांच्या जोरावर

भारतीय सैन्य दलात बीएसएफ मध्ये भरती झाली आहे.  वडार समाजामध्ये परळी तालुक्यात प्रथमच एका कन्येने सैन्य दलात भरती होण्याचा पराक्रम केला आहे.

 सैन्य दलातील भरती झालेल्या निकिताचे वडील हे मेकॅनिक चे काम करतात तर आई मिळेल ती मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह  करतात.2 भाऊ, 2 बहीण असलेल्या कुटुंबात निकिताने लहानपणी सैन्य दलात भरती होऊन देश सेवा करण्याचे स्वप्न पाहिले.शिक्षण शिकत आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने आपले जीवाचे रान केले.सैन्य दलाची केवळ परीक्षा उत्तीर्ण न होता शारीरिक चाचणी उत्तीर्ण होत तिने सैन्य दलाचे प्रशिक्षण पश्चिम बंगाल येथे यशस्वीपणे पूर्ण करून निकिताने आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फेडले आहे. 

सैन्य दलाचे प्रशिक्षण यशस्वी पूर्ण करून आल्याच्या निमित्ताने वडार समाजाच्या वतीने निकिताचे ट्रॅक्टर मधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. जागोजागी नागरिकांनी पुष्पहार घालून तिचे स्वागत केले व तिला शुभेच्छा दिल्या.यावेळी सत्काराला उत्तर देताना निकिताने सांगितले की,समाजात विशेषतः मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे मात्र पालकांनी आणि मुलींनी जर ध्येय उराशी बाळगलं तर समाजाचा जरी दगडफोडीचा पिढीजात व्यवसाय शिक्षणाच्या जोरावर मुलींना उच्च शिक्षण घ्यावे नक्कीच त्या जीवनात यशस्वी होतील अशी भावना निकिताने याप्रसंगी व्यक्त केली.


*बीडचा होतो बिहार...|*
*भररस्त्यात प्रतिष्ठित व्यापाऱ्याची हत्या...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/beed.html*

*मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज...*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/04/blog-post_20.html*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या