Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत रस्त्यावर झाली घसरगुंडी|नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया

आपला ई पेपर 


परळी येथे काल झालेल्या भुर भुर पावसाने परळी शहरातील गार्डन रोड ते बस स्टँड भागात परळी न.प.ने भुयारी नाल्याचे पाईप लाईनचे खोद काम केले असून त्यामुळे खोदलेले रस्ते व्यवस्थित रित्या न बुजविल्यामुळे सर्व रस्त्यावर चिखल झाला आहे. यात एक अवजड वाहन भर रस्त्यातच आडवे होऊन चिखलात फसल्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.


या रस्त्यावर चालताना  दुचाकी आणि पदचार्‍याना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सदरील रस्त्यावर अपघात घडत असून अनेकांना याचे नुकसान हे झाले आहे. त्यामुळे नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.परळी शहरात नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे रस्ते व नाल्यांवर घसरगुंडी आणि चिखल वाढला आहे





*हेही वाचा..परळीत बचपन प्ले स्कूल मध्ये दंत आरोग्य तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद*

*आपला ई पेपर |PARLi|*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/bachpan.html*

*मोठी बातमी...
*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

अनेक भागात नालीवर आणि रस्ते खाली अश्या पद्धतीने नालीबांधकाम झालेले आहे. त्यामुळे मोंढ्या मार्केट भागात रस्ताचे चक्क तळेच  झाल्याचा भास होत होता.दुकानांच्या चौकटीपर्यंत पाणी पोचले होते.

परळी नगरपरिषद ने नगर विकासाच्या नावाखाली कर पैसे घेतात अन्...हा कर भरणारे व्यापारी पावसाच्या साठलेल्या पाण्याने त्रस्त असताना अधिकारी मात्र आपल्या कार्यालयातून बाहेर पडण्यास सुद्धा तयार नाहीत.

शहरात नगरपरिषद आहे का ? नगर रचनाकार आहे का ? असा प्रश्न पडावा अशी रस्ते व नाल्यांची बोगस कामे झाली आहेत.

मुख्याधिकाऱ्यांनी शहरात फिरून नागरिकांच्या समस्या त्वरित जाणून घ्याव्यात व शहरातील नित्कृष्ठ व चुकीच्या झालेल्या रस्ते व नाल्याची कामे दुरुस्त करून व्यापारी व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी मनसेचे शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी केली आहे.


*मोठी बातमी | पिक्चर अभी बाकी है..मेरे दोस्त*

*|नरेंद्र मोदींची |शरद पवारांनाच | मोठी ऑफर ?|राष्ट्रवादीसोबत चर्चा..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_24.html*

*"पिकं तुडवू नका रे... आधीच थोडं उगवलं..*
*..आणखी त्यांचे नुकसान करू नका!" कृषीमंत्री धनंजय मुंडे बांधावर..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_43.html*

*कौतुकास्पद |कृषिमंत्री धनंजय मुंडेनी |अवघ्या काही तासात दिला आदेश..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/36.html*

*हे..परळीकर म्हणून हे वेदनादायी आहे...*
*आपला ई पेपर |Parli|*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_66.html*

*मोठी बातमी...
*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या