Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पंकजाताई मुंडेंचा वाढदिवशी प्रभू वैद्यनाथास अभिषेक, दीर्घायुष्य,उज्ज्वल यशासाठी केली प्रार्थना

पंकजाताई मुंडेंचा वाढदिवशी  भाजपचा कार्यकर्त्यांचा सामाजिक सेवा उपक्रम 


आपला ई पेपर परळी वैजनाथ 

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस भाजपच्या वतीनं आज विविध सामाजिक सेवा उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.मोफत आधारकार्ड अपडेट कॅम्पला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यासाठी नागरिकांनी संपर्क कार्यालयात एकच गर्दी केली होती. सुकन्या समृद्धी योजनेचे मोफत पासबुक, वृत्तपत्र वितरकांना रेनकोट, बेल-फुल विक्रेत्यांना छत्री, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वृक्षारोपण आदी भरगच्च  कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलं होतं.

  राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेलं संकट लक्षात घेऊन वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय पंकजाताईंनी घेतला होता. तथापि भाजपच्या वतीनं आज शहरात त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक सेवा उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. सकाळी ७ वा. प्रभू वैद्यनाथास अभिषेक करून कार्यकर्त्यांनी त्यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल यशासाठी प्रार्थना केली. त्यानंतर  मेरू गिरी डोंगरावर ५० वृक्षांचे वृक्षारोपण, मलिकपुरा येथे दाऊद अली शहाबाबा  दर्गा येथे चादर अर्पण, भीमनगर भागातील सुगंध कुटी, बुध्द विहार येथे बुध्दवंदना, उप जिल्हा रूग्णालयात रूग्णांना फळ वाटप, सरस्वती विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.


आधारकार्ड अपडेट कॅम्पला गर्दी

अरूणोदय मार्केट मधील संपर्क कार्यालय येथे आज दिवसभर आधार अपडेट कॅम्प घेण्यात आला.नागरिकांनी याचा मोठा लाभ घेतला.कॅम्पमुळे अनेकांची चांगली सोय झाली. याचवेळी सुकन्या समृध्दी योजनेचे पासबुक वितरण,वृत्तपत्र वितरकांना रेनकोट वाटप तसेच वैद्यनाथ मंदिरासमोरील बेल-फुल विक्रेत्यांना पावसाळी छत्र्या देण्यात आल्या. याउपक्रमात भाजपचे सर्व पदाधिकारी,  कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या