Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पुन्हा एकदा ना.धनंजयजी मुंडे यांच्या वैद्यनाथभक्ती आणि संवेदनशीलतेचे दर्शन


मुरारी बापूंचे द्वादश पंचम् ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथ दर्शन 
आपला ई पेपर

साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा..मुरारी बापूंचे दर्शन एक अविस्मरणीय,अवर्णनीय घटना - बाजीराव धर्माधिकारी 

राम-नाम-जप-मनि-दिप धरु जीह देहरी द्वार!

"तुलसी" भीतर बाहरौ जौ चाहसि उजियार!!

भारत देशातील थोर संत,सुप्रसिध्द रामचरित मानस कथाकार,आधुनिक युगातील "गोस्वामी तुलसीदास",श्रद्धेय मुरारी बापूजी यांनी आज राज्याचे कृषीमंत्री तथा परळीचे लोकप्रिय आमदार ना.धनंजय मुंडे यांच्या विनंतीस मान देवून त्यांनी आयोजित केलेली बारा ज्योतिर्लिंग यात्रा विशेष रेल्वे ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्रास आणून द्वादश पंचम् ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले यावेळी उपस्थित राहिलो...!

श्री.मुरारी बापू बारा ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र यात्रेवर असून आज त्यांचे श्रीशैल्यम् वरुन सकाळी विशेष रेल्वेने परळीला आगमन झाले.स्वतः कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी बापूजींचे वैद्यनाथ नगरीत सहृदय स्वागत करीत त्यांचे सारथ्य देखील केले.ना.धनंजय मुंडे यांनी बापूजी समवेत विविध विषयी दीर्घ चर्चा देखील केली.

पहाटेच्या चैतन्यमयी,मंगलदायक वातावरणात आणि युगसंताच्या आगमनाने वैद्यनाथ मंदिर परिसर व रेल्वे स्थानक गजबजून गेले होते.एका अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार आज होता आले.आदरणीय साहेबांनी प्रभु वैद्यनाथ दर्शन प्रसंगी बापूजींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग जीर्णोध्दार केल्यानंतर निर्माण केलेला "शिलालेख" दाखविला तसेच वैद्यनाथ देवल कमेटीने "आद्य शंकराचार्य" यांनी बारा ज्योतिर्लिंग यात्रा दरम्यान परळी वैद्यनाथ दर्शनाचा दस्तसुध्दा दाखविला.


ना.धनंजय मुंडेनी परम् पूज्य मुरारी बापूजींना द्वादश पंचम् ज्योतीर्लिंग श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे "रामकथा" सेवा देण्याची विनंती केली असता बापूजींनी ता होकार दिला.आपल्यासाठी ही आनंदाची पर्वणी असणार आहे.ना.धनंजय मुंडे साहेब मंत्री असून देखील कुठलाही विशेष अभिनिवेश न बाळगता त्यांच्या सहजतेने बापूजी प्रभावित झाले.आपल्या निकटवर्तीयां समवेत संवाद साधताना बापूजींनी "मंत्री होकर भी धनंजय कितने सरल स्वभाव के हैं!" हे गौरवोद्गार काढले.बापूजींनी ना.धनंजय मुंडे यांच्यासह उपस्थित सर्वच सहकाऱ्यांना भरभरुन आशीर्वाद दिले.

रेल्वेमध्ये प्रवेश करीत असताना एक भाविकाने बापूजी यांना मोठ्या आवाजात सांगितले की "बापूजी परली मे आपके कथा का इंतजार रहेगा" तेंव्हा बापूजी तात्काळ "मुंडे साहब ने बुलाया हैं..जरुर आयुंगा!!" असे सकारात्मक उत्तर दिले,हा प्रसंग रोमहर्षक होता..परळीमध्ये  युगसंत मुरारी बापू यांनी येणे आणि वैद्यनाथ ज्योतिर्लिंग म्हणून श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान अधोरेखित करणे ही मोठी उपलब्धता आहे.

आज हे सारं स्वप्नवत असणारे शक्य झाले ते केवळ राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने आणि संवेदनशीलतेमुळे.. लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श आज साहेबांनी पुनश्च सिद्ध केला...धन्यवाद साहेब! आज एका मंतरलेल्या मंत्रमुग्ध दिवसाचे साक्षीदार आम्हाला होता आले!!


*मोठी बातमी | पिक्चर अभी बाकी है..मेरे दोस्त*

*|नरेंद्र मोदींची |शरद पवारांनाच | मोठी ऑफर ?|राष्ट्रवादीसोबत चर्चा..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_24.html*

*"पिकं तुडवू नका रे... आधीच थोडं उगवलं..*
*..आणखी त्यांचे नुकसान करू नका!" कृषीमंत्री धनंजय मुंडे बांधावर..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_43.html*

*कौतुकास्पद |कृषिमंत्री धनंजय मुंडेनी |अवघ्या काही तासात दिला आदेश..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/36.html*

*हे..परळीकर म्हणून हे वेदनादायी आहे...*
*आपला ई पेपर |Parli|*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_66.html*

*मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या