Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी परळीत 2 ऑगस्ट रोजी शोकसभेचे आयोजन

आपला ई पेपर


परळी दैनिक मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांचे दि.30 जुलै 2023 रोजी दुःखद निधन झाले. या निधनामुळे वृत्तपत्र क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. प्रशांत प्रभाकर जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी परळीत औद्योगिक वसाहतीच्या सभागृहात दिनांक 2 ऑगस्ट रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही बातमी वाचा.. स्वर्गीय जोशी काकाच्या स्मृतित.. दररोज तुम्हाला या लिंकवर एक सुरेल आवाजात गाणे ऐकायला मिळेल...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post.html*

  प्रशांत जोशी यांच्या अकाली निधनाने परळीतील वृत्तपत्र क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण  झाली आहे. याबद्दल दैनिक मराठवाडा साथी परिवार व समस्त पत्रकार व मित्र मंडळ परळी च्या वतीने दि. 2 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11  वाजता औद्योगिक वसाहत सभागृह येथे शोकसभेचे आयोजन केले आहे.

    या कार्यक्रमास परळी शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार, सर्वसामान्य नागरिक, हितचिंतक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन दैनिक मराठवाडा साथी परिवार व समस्त पत्रकार मित्रमंडळी यांनी केले आहे.

*सकारात्मक पत्रकारितेचा आदर्श घालून देणारा ‘प्र’शांत झाला...!*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_89.html*

*नि:शब्द...*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_81.html*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या