Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत अधिक मासानिमित्त पंचकुंडात्मक हरिहर याग व शिव महापुराण कथेचे आयोजन

आपला ई पेपर | परळी वै|



पुरूषोत्तम मास (अधिक मास) पर्वकाळ निमित्ताने विश्व शांती तथा लोक कल्याणार्थ येथील श्री सुर्वेश्वर प्रभूंच्या सानिध्यातदि. 26 जुलै 2023 ते 1 ऑगस्ट 2023 पर्यंत सकाळी 8 ते 12 या वेळेत पं.विजयजी पाठक यांच्या आचार्यत्वात पंचकुंडात्मक हरिहर याग व दुपारी 2 ते 6 या वेळेत पं. उत्तमजी शास्त्री यांच्या रसाळ वाणीतून शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. 


या भव्यदिव्य धार्मिक कार्यासाठी विधिवत यज्ञशाळा व वॉटरप्रूफ कथामंडप उभारणीच्या कामास वेग आला असून यज्ञशाळा निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आले असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.

परळी वैजनाथ तीर्थक्षेत्रातील भाविकांना शिव महापुराण कथा आणि पंचकुंडात्मक हरिहर यागाचा लाभ व्हावा यासाठी श्री सुर्वेश्वर मंदिर विकास समितीच्या वतीने प्रयत्न केले जात असून जास्तीत जास्त संख्येने भाविक भक्तांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सुर्वेश्वर मंदिर विकास समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

भव्य शोभा यात्रा...

दरम्यान पंचकुंडात्मक हरिहर याग व शिव महापुराण कथेच्या शुभारंभ प्रसंगी भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. दि.26 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वाजता मोंढा विभागातील हनुमान मंदिर येथून शोभा यात्रा सुरू होऊन मोंढा, राणी लक्ष्मीबाई टाॅवर, जिजामाता उद्यान मार्गे सुर्वेश्वर मंदिर येथील कथास्थळी येणार आहे.यात महिला पुरूषांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

*हे..परळीकर म्हणून हे वेदनादायी आहे...*
*आपला ई पेपर |Parli|*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_66.html*

*अवैध धंदे बंद केल्याप्रकरणी कर्तव्यदक्ष पोनि सलीम चाऊस यांचा सत्कार*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_84.html*

मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या