Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

◆परळीत तीव्र आंदोलन मणिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ सर्व पक्षीय सहभाग

●मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा- अजय बुरांडे 


आपला ई पेपर |परळी|

देशाच्या मणिपुर राज्यात मागील तीन महिन्यापासुन हिंसाचार सुरू आहे. खुलेआम महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढून बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी तसेच या घटनेत जबाबदार असणाऱ्या केंद्र राज्य सरकारच्या निषेधार्थ परळीत माकपने आयोजित केलेल्या निषेध आंदोलनात सर्व पक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन निषेध व्यक्त केला. याप्रसंगी बोलताना अजय बुरांडे म्हणाले की, मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची नितांत गरज आहे. 

   

महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामुहिक आत्याचार केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारीत झाल्याने देशातील जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ माकपणने रविवार दि 23 रोजी परळी येथील राणी लक्ष्मीबाई टावर चौकात निदर्शने आंदोलन आयोजित केले होते. याप्रसंगी या घटनेस जबाबदार असणाऱ्या मणिपूर राज्य सरकारचा तसेच केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांचा जाहीर निषेध करण्यात आला.

   

यावेळी निदर्शनेकर्त्यांनी मणिपूर येथील घटनेत जबाबदार असणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचा धिक्कार असो, केंद्र सरकारचा करायचं काय खाली मुंडकं वर पाय, सेव्ह इंडिया,  मणिपूर वाचवा- सविधान वाचवा- लोकशाही टिकवा अशा प्रकारच्या घोषणा देऊन केंद्र व मनिपुर सरकारचा जाहीर निषेध केला याप्रसंगी उपस्थित विविध पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ आपले मनोगत व्यक्त केले.

     

या आंदोलनात शिक्षक नेते पी. एस. घाडगे, कॉम्रेड अजय बुरांडे,कॉ.पांडुरंग राठोड, काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूर भाई, काँग्रेस नेते वसंत मुंडे, रिपाईचे राज्य सचिव भास्कर नाना रोडे, प्राध्यापक दास वाघमारे, कॉम्रेड नागरगोजे, मनसे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, कॉम्रेड परमेश्वर गीते, सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, जेष्ठ पत्रकार रानबा गायकवाड, भगवान साकसमुद्रे, कामगार नेते प्रा.बी.जी. खाडे, राहुल घोबाळे, संभाजी ब्रिगेडचे विद्याधर शिरसाठ, पांडुरंग मोरे, विठ्ठलराव झिलमेवाड,  प्रशांत कामाळे, धम्मा शिरसागर, भारत ताटे, लक्ष्मण वैराळ, गौतम साळवे, यांच्यासह पुरुष, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ परळी तालुक्यातील सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने येत्या 29 जुलै रोजी सर्वपक्षीय व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या