Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अवैध धंदे बंद केल्या प्रकरणी कर्तव्यदक्ष पोनि सलीम चाऊस यांचा सत्कार

PSI

आपल्या पाल्यावर चांगले संस्कार करा|प्रशासन म्हणून आम्ही सक्षमपणे पाठीशी|पोनि. चाऊस

आपला ई पेपर |Parli|


परळी चांगला समाज घडवायचा असेल तर महिलानी अगोदर आपल्या पाल्यांवर चांगले संस्कार केले पाहिजेत.आम्ही प्रशासन म्हणून आपल्या पाठीशी सक्षमपणे  उभे आहोत.समाजातील वाईट चालीरीती बंद झाल्या पाहिजेत. अवैध मार्गाने जे कोणी धंदे करीत असतील त्यांची गय केली जाणार नाही.असे प्रतिपादन संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी सत्काराला उत्तर देताना केले..


|Parli|शहरातील महात्मा फुले नगर,तालाब कट्टा, नुर मोहल्ला भागातील अवैध धंदे बंद केल्याप्रकरणी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांचा सत्कार दि22जुलै रोजी सांची बुद्ध विहार,फुलेनगर येथे आयोजित केला होता..  


या कार्यक्रमात बोलताना पो.नि. चाऊस म्हणाले की,गुन्हेगाराची गय केली जाणार नाही.या भागतील अवैध धंदे मी आहे तोपर्यंत चालु होणार नाहीत.परंतु कुटुंबातील मोठ्या व्यक्तीने पालक म्हणून आपल्या पाल्यावर चांगले संस्कार केले तर अवैध धंदे चालणारच नाहीत त्यासाठी मुलांना चांगले शिक्षण द्या,व्यसनापासून अलिप्त ठेवा,चांगले संस्कार द्या असे आवाहन त्यांनी सत्काराला उत्तर देताना केले..

याप्रसंगी  वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद घाडगे यांनी म्हटले की, पंचशील तत्त्वाचे पालन करावे |Parli|राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अनंत इंगळे यांनी मार्गदर्शन केले.इंगळे पुढे म्हणाले की,समाजाने एकोपा दाखवल्यामुळे आज हे चांगले दिवस आले आहेत.तसेच रात्रीची पेट्रोलिंग करून येथील नागरिकांना धीर पोनि.सलीम चाऊस देत आहेत.यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सरकारी अभियोक्ता म्हणून निवड झाल्याबद्दल ॲड.संविधान वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला..

यावेळी |Parli| माजी नगरसेवक रवि मुळे, केशव गायकवाड,उत्तम कांबळे, फुले-आंबेडकरी अभ्यासक इंजि.भगवान साकसमुद्रे,पोलीस उपनिरीक्षक चंद्रच्या आयटवार, पोलीस शत्रुघन शिंदे,बौद्धजन संघर्ष समिती चे राहुल घोबाळे, गफूर शेख,भगवान साळवे, पत्रकार अफसर सय्यद,अँड. दिलीप उजगरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

या कार्यक्रमास  किरण वाघमारे, सनी देवडे,अशोक गवळी,अमर सूर्यवंशी,अजय साळवे,राहुल, पैठणे, दीपक शिंदे,नितीन घाटे, शेख नबी, शेख अमन, नागोराव मिसाळ , सुरज सिंग जुनी,सिद्धार्थ चक्रे, अंकुश वाघमारे आदी भागातील महिला, पुरुष व युवक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन प्रभागाचे नगरसेवक केशव गायकवाड यांनी केले.

हेही  वाचा..BEED |शाळेतील शिपायाचा डोक्यात दगड घालून खून |आरोपी फरार*
https://aplaepaper.blogspot.com/2023/07/murder.html*

*CMB | दरपत्रक न लावणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर तात्काळ कारवाई करा |चंदुलाल बियाणी*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/cmb.html*

*बनावट नोटा प्रकरणात |परळी|अंबाजोगाई|तील चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_21.html*

मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या