Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत 80 लाख रुपयांची जाहिरात बील थकीत | भु-संपादन कार्यालयाची दिरंगाई

वृत्तपत्रांची थकीत जाहिरात बीले देण्याची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी 


आपला ई पेपर | बीड | 

जिल्ह्यातील वृत्तपत्राची भूसंपादन कार्यालयं आणि इतर शासकिय कार्यालयांकडे जवळपास ७० ते ८० लाख रुपयांची जाहिरात बील थकीत असुन, सदरील थकीत जाहिरात बीले तात्काळ देण्यात यावीत अशी मागणी बीड जिल्हा संपादक संघाच्या वतीने राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे करण्यात आली असून, या प्रकरणी आपण जिल्हा प्रशासनाला सूचना देऊन जाहिरात बीले अदा करण्यात येतील असे सांगितले.

राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी येथील निवासस्थानी संपादक संघाचे सतिश बियाणी, प्रकाश सूर्यकर, राजेश साबणे, रामप्रसाद गरड भेट घेऊन निवेदन दिले. 


दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील विविध भु-संपादन कार्यालयामार्फत जिल्ह्यातील वृत्तपत्रांना शासकीय प्रकल्प लागण्यासाठी जमिनी संपादित करण्यासाठी जाहिराती देण्यात येतात. ही परंपरा वर्षानुवर्षे चालू आहे. सदर जाहिरातीची देयके शासकीय यंत्रणेमार्फत दिली जात असतात, परंतु मागील काही वर्षातील अनेक रोजगार हमी योजना भू-संपादन जाहिरातींची देयके केवळ संबधित कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या दप्तर दिरंगाई आणि निष्काळजीपणामुळे प्रलंबित राहिली आहेत. तसेच नगर पालिका, बांधकाम विभाग, पाणी पुरवठा, जिल्हा परिषद आदी विविध कार्यालयात वृत्तपत्रांची देयके प्रलंबित आहेत. 

ती अदा करण्यात यावीत. या संदर्भात प्रशासनाकडे आणि शासनाकडेही वारंवार विनंती अर्ज, निवेदन आणि प्रत्यक्ष भेट घेतलेली आहे. सदर विषय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्राधान्याने हाताळून यातून मार्ग काढावा व जिल्ह्यातील वृत्तपत्रांची शासनाकडे असलेली थकीत रक्कम देण्याची कारवाई करावी अशी मागणी बीड जिल्हा संपादक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी आपण जिल्हा प्रशासनाला याबाबत तात्काळ कारवाई करण्याची सूचना करुन आपला प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले.

*"पिकं तुडवू नका रे... आधीच थोडं उगवलं..*

*..आणखी त्यांचे नुकसान करू नका!" कृषीमंत्री धनंजय मुंडे बांधावर..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_43.html*

*परळीत नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_37.html*

*कौतुकास्पद |कृषिमंत्री धनंजय मुंडेनी |अवघ्या काही तासात दिला आदेश..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/36.html*

*हे..परळीकर म्हणून हे वेदनादायी आहे...*
*आपला ई पेपर |Parli|*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_66.html*

मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या