Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीतील जनतेचे शिवसेनेवर प्रचंड प्रेम व विश्वास..

शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम उत्साहात संपन्न 

आपला ई पेपर | Parli |

परळीत शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी परळी मध्ये मागील काही दिवसांपासून सुरु होती.त्यास परळीतील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला फक्त तीन दिवस मध्ये हजारोच्या संख्येने प्राथमिक सदस्य नोंदणी चे फॉर्म भरण्यात आले व जनतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम हे उल्लेखनीय आहे व कोणत्याही संकट समयी मदतीला धावणारे नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे त्यांच्या कामास प्रभावित होऊन जेष्ठ नागरिक,महिला व युवक,युवती यांनी प्राथमिक सदस्य नोंदनी अभियानास भरभरून प्रतिसाद दिला.

परळी मध्ये शिवसेनेचे कार्य उत्तुंग व प्रभावी आहे जनतेच्या सेवेसाठी शिवसैनिक हा कधीही तत्पर असतो त्यामुळेच नागरिक हे शिवसेना ह्या संघटनेवर अविरत विश्वास दाखवतात व त्यामुळेच हजारो नागरिकांनी शिवसेनेचे सदस्यत्व स्वीकारले.

प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान हे शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन भैया मुळूक,युवासेना कोअर कमिटी सदस्य अविनाश खापे पाटील,युवासेना जिल्हाप्रमुख सुमित भैया कोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

 याप्रसंगी युवासेना तालुकाप्रमुख सोमेश्वर गित्ते,युवासेना उपजिल्हाप्रमुख बालासाहेब देशमुख,युवासेना शहरप्रमुख गजानन कोकीळ,युवासेना संघटक शिवराज गित्ते,गित्ते,युवासेना उपशहरप्रमुख सागर बुंदुले,युवासेना शहर सचिव शैलेश कदम आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या