Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

नगरपालिका मतदार यादीत प्रचंड गोंधळ?

 सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली निवडणूक प्रशासन कटपुतळीप्रमाणे काम करीत आहे - बहादूर भाई 



आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 

आगामी परळी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादी मध्ये प्रचंड गोंधळ असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने याविषयी  निवडणूक आयोगाकडे आमचा आक्षेप नोंदविला होता.परंतू सत्ताधाऱ्यांच्या दबावापुढे निवडणूक प्रशासन एखाद्या कटपुतळीप्रमाणे काम करीत असल्याचेही काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी आज दिनांक 13 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

     पत्रकार परिषदेत पुढे बोलताना  काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूर भाई यांनी नगरपालिका निवडणूक प्रशासनाने कशा प्रकारे चुकीची प्रभाग रचना केली आहे हे नकाशानुसार दाखविले. एका वार्डातील मतदार दुसऱ्या वार्डात तर दुसऱ्या वर्गातील मतदार जुन्या वार्डात टाकून प्रभाग रचना बनविण्यात आली आहे. यातून सत्ताधारी नेत्यांचा पॉकेट मतदार वाढवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. यामध्ये नैसर्गिक नियमांचा वापर न करता सत्ताधाऱ्यांना अपेक्षित अशी मनमानी प्रभाग रचना बनविण्यात आली आहे. ज्यात मतदारांच्या संख्येतही प्रचंड प्रमाणात तफावत दिसून येते आहे.हे उदाहराणासह पटवून देतांना 1600 मतदारांसाठी 2 नगरसेवक,5000 मतदारांसाठी 3 तर 9000 हजार मतदार असलेल्या प्रभागात 2 नगरसेवक अशी चुकीची रचना जाणीवपूर्वक केल्याचे दाखवून दिले.

    परळीतील  प्रभाग रचनेवर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. परंतु बीड जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणीआमचा आक्षेप यावर सुनावणी झाली पण त्याचा निकाल दिला नाही.तरीही परळी नगर परिषदेच्या प्रभाग रचना, प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली रचना, आरक्षण व मतदार याद्या बनविण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान आमचा आक्षेप निवडणूक प्रशासनाने ऐकून घेतला नसल्यामुळे आम्ही लवकरच संभाजीनगर हायकोर्टात याचिका दाखल करणार आहोत आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलने उभे करू असे बहादूर भाई यांनी सांगितले. दरम्यान परळी नगर परिषदेचे प्रभाग रचना नव्याने तयार करून निवडणुका घ्याव्यात अशी मागणी ही या पत्रकार परिषदेद्वारे बहादुर भाई यांनी केली आहे. 

   या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे परळी शहर  अध्यक्ष सय्यद हनीफ सय्यद करीम उर्फ( बहादूरभाई) कार्यकारी अध्यक्ष शशी शेखर चौधरी,  उपाध्यक्ष सुभाषसर देशमुख, वैजनाथराव गडेकर,इतशाम खतिब, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष  रसूल खान, शहराध्यक्ष सद्दाम भाई गुत्तेदार,अनुसूचित शहराध्यक्ष दीपक राव शिरसाठ, प्रवक्ते बदरभाई, युवा नेते बाबा भाई, इत्यादी काँग्रेसकडून उपस्थित होते.