Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आजही प्रत्येकाला प्रेरणा देणाऱ्या त्या शब्द सुमनाचा बादशाह असणारे प्रशांत प्र जोशी आम्हा सर्वांना निशब्द


आजही प्रत्येकाला प्रेरणा देणाऱ्या  त्या शब्द सुमनाचा बादशाह असणारे प्रशांत प्र जोशी आम्हा सर्वांना निशब्द करून गेले माणसानं जवळ पैशाची श्रीमंती नसली तरी चालेल पण मात्र विचारांची श्रीमंती नक्की असायला हवी कारण विचार हे ज्ञान प्राधान्य करतात आणि ज्ञान हे जीवन जगण्याचं समाधान देत.. 

दैनिक मराठवाडा साथी मधील प्रत्येक बातमी ही वाचनीय व सर्व घटकाला न्याय देणारी असते . परळी शहरातील सर्व क्षेत्रांतील बातम्या वर्तमानपत्रात नेहमीच बातमीच्या स्वरूपातून कौतुकाची प्रेरणा देणारे  बातमीत नेमकं काय हवं, बातमीतील शब्दाचा वापर कसा हवा या बाबतींत सातत्याने  प्रत्येकला.. प्रोत्साहन देणारे गुरूंवर्य....! कधीही साध्या ब्र.. शब्दनेही कुणाचे मनाला  दुःख वेदना होऊ न देता आपुलकी आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण याची काळजी घेणारे प्रशांत जोशी सर्वांचे जोशी काका यांनी आज अखेरचा श्वास घेऊन आम्हा प्रत्येकांना निशब्द केले.

दैनिक मराठवाडा साथीचे विविध कार्यक्रमात दिल्या जाणारे पारितोषक व स्मरणपत्र आज प्रत्येकाच्या भिंतीवर लटकवलेली आहे. त्याच्यातील स्तुती सुमने जी वाचून आजही प्रत्येकाला प्रेरणा मिळते त्या शब्द सुमनाचा बादशाह असणारे प्रशांत प्र जोशी आज  आम्हा सर्वांना निशब्द करून गेले हे दुःख कधीही भरून न निघणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या