Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत भगवान विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी अनोखी धमाल...

परळी आपला ई पेपर 


भगवान प्राथमिक विद्यालय परळी वैजनाथ येथे आज शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करून शाळा प्रवेशाचा उत्साह द्विगुणित करण्यात आला.

आज शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ आणि पुस्तके देऊन स्वागत करतानाच गल्लीतील मान्यवर, संस्थाप्रमुख व मुख्याध्यापक ,शिक्षकांनी खाऊ वाटप करून अनोख्या पद्धतीने मुलांचे स्वागत केले .










शाळेत आजच्या दिवशी मुलांसाठी खास सेल्फी पॉईंट उपलब्ध करून देण्यात आला होता.

शाळेच्या पहिल्याच दिवशीच्या या स्वागताने मुलांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता तर शालेय परिसरात मंगलमय उत्साहवर्धक वातावरण तयार झाले होते.

मुख्य प्रवेशद्वाराजवळ शाळेच्या नावाची आकर्षक कमान उभारण्यात आली होती तर  रांगोळींनी आणि पायघड्यांनी विद्यार्थ्यांसाठी पायवाट करण्यात आली होती, विद्यार्थ्यांच्या या अनोख्या स्वागत सोहळ्याने परिसरातील पालक वर्गही समाधानी दिसत होता.

 शाळा प्रवेशाच्या या अनोख्या स्वागत समारोहावेळी संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्रीताई व्यंकटराव कराड, बीड जिल्हा वाहतूक शाखेचे माजि पोलीस उपनिरीक्षक सुरेशराव गीते, आयडीबीआय बँकेचे माजी व्यवस्थापक गोपाळराव तांदळे, गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे माननीय बंदरमामा, शाळेचे मुख्याध्यापक लिंबाजीराव दहिफळे, बंडू होळंबे ,प्रभाळे मॅडम आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

      या देखण्या स्वागत समारोहाचे समयोचित असे सूत्रसंचालन शिक्षक नेते, मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य व शाळेतील ज्येष्ठ शिक्षक बंडू आघाव सर यांनी केले आणि शाळेच्या अभिनव उपक्रमाविषयीचे प्रास्ताविक अनंत मुंडे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार सचिन अंबाड सर यांनी मानले.

     शालेय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या  शिक्षकांचा यावेळी संस्थेच्या वतीने भाग्यश्रीताई कराड यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला .

यावेळी सर्व मान्यवरांची समायोजित व शाळेच्या प्रगती विषयक वाटचालीसाठी शुभेच्छा देणारी भाषणे झाली.

 शाळेतील सहशिक्षिका अंजली कुलकर्णी यांनी विशेष परिश्रमाने विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते यावेळी करण्यात आले.

 एकंदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांचे योगदान आणि सहकार्य लाभले.


*धक्कादायक | परळीत आरोपीचा मृत्यू ?

*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_14.html*

*सावधान | अमेझॉनवरुन ऑनलाईन मोबाईल ऑर्डर केला अन्...*

https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_13.html

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या