Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सध्याच्या स्पर्धच्या युगातविद्यार्थ्यांनी स्वतःशी स्पर्धा करावी: नीलम बाफना

 माजलगाव विकास प्रतिष्ठान ठरते विद्यार्थ्यांसाठी वरदान...


माजलगाव | प्रतिनिधी 

येथील माजलगाव विकास प्रतिष्ठान तर्फे आधार प्रकल्पांतर्गत गरजु विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा शैक्षणिक साहित्य वाटप मंगलाताई सोळंके,नीला देशमुख,नीलम बाभना, उपविभागीय अधिकारी  माजलगाव, प्राचार्य डॉ.गोवर्धन सानप,संतोष डोंगरदिवे,प्राचार्य अन्वर शेख,पत्रकार दिनकर शिंदे,दीपक थावरे यांच्या हस्ते करण्यात आले.



सविस्तर वृत्त असे की, माजलगाव प्रतिष्ठान गेल्या १७ वर्षापासून गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, शैक्षणिक सहल, महिला मेळावा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करत आलेले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या माजलगाव च्या उपविभागीय अधिकारी निलम बाभना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाले आहे त्यांनी याचा सदुपयोग करून खुप मोठं व्हावे. सध्याच्या स्पर्धच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःशी स्पर्धा करावी असे प्रतिपादन त्यांनी केले.

सुंदरराव सोळंके महविद्यालयाचे प्राचार्य डॉ गोवर्धन सानप यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचा पाया मजबूत करावा,असे मत व्यक्त केले  तसेच संतोष डोंगरदिवे यांनी शासनाच्या वेगवेगळ्या योजना बद्दल माहिती दिली व या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

माजलगाव विकास प्रतिष्ठान च्या सचिव नीला देशमुख यांनी सध्या बालविवाह रोखण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यायला पाहिजे असे नमूद केले. 



आपल्या समारोपीय भाषणात प्रतिष्ठान च्या अध्यक्षा मंगलाताई सोळंके यांनी ज्या विद्यार्थ्याना एक पालक आहेत किंवा ज्या मुलांना आई वडील नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी माजलगाव विकास प्रतिष्ठान असेल अशी ग्वाही दिली. 


आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती असलेले शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपले भविष्य उज्वल करावे तसेच त्यांनी तरुण वयातील मुलामुलींच्या समस्येबाबत सविस्तर चर्चा केली. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकनेते सुदंरराव सोळंके बँकेचे कार्यकारी अधिकारी सुहास सोळंके, महादेव वाघ, सिंदफणा पब्लिक स्कूल चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सखाराम जोशी तर आभार रेश्मा शेख यांनी मानले.

*NEET परीक्षेत बंसल...* *क्लासेसचाच महाराष्ट्रात डंका*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/neet-705.html*

*गुणवंत विद्यार्थ्यांचा लवकरच सत्कार-चंदुलाल बियाणी*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या