Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

UPSC परीक्षेत चाणक्य मंडलचे घवघवीत-अविनाश धर्माधिकारी

 



UPSC परीक्षेत चाणक्य मंडलचे घवघवीत-अविनाश धर्माधिकारी 

आपला पेपर

पुणे दि २३ मे नुकताच केंद्रीय लोकसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून चाणक्य मंडलच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे घवघवीत यश संपादित केले आहे. संपूर्ण भारतात पहिली आलेली इशिता किशोरे आणि महाराष्ट्रात पहिली आलेली ठाण्याची कश्मीरा संखे या दोघींनी चाणक्य मंडल परिवारमध्ये मार्गदर्शन घेतले आहे.


यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून एकूण ९३३ जागांसाठी उमेदवारांची निवड केली आहे, त्यापैकी तब्बल २८० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये विविध टप्प्यांवर मार्गदर्शन घेतले आहे.संपूर्ण भारतात पहिल्या १० मधील  ४, २५ मधील  ९ तर १०० पैकी ३२ विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये परीक्षेसंबंधी मार्गदर्शन घेतले. इतर विद्यार्थ्यांबरोबरच चाणक्य मंडल परिवारचा आधी विद्यार्थी आणि नंतर फॅकल्टि असलेला सागर खरडे याने देशात ४४५ वा रॅंक मिळवला आहे. 

गेल्या २६ वर्षांपासून स्पर्धापरीक्षा क्षेत्रात कार्यरत असलेल्या चाणक्य मंडल परिवारने आजवर हजारो 'कार्यकर्ता अधिकारी' राज्याला आणि देशाला दिले आहेत. स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी घडवण्यासाठी कार्यरत असलेली संस्था, अशी चाणक्य मंडल परिवारची ओळख आहे. 

केंद्रीय लोकसेवा (यूपीएससी) परीक्षेत विक्रमी निकाल नोंदवत असतानाच यावर्षी निवडले गेलेले चाणक्य मंडलचे विद्यार्थी देशाच्या जवळपास सर्व राज्यांतून आहेत. मागील पाच वर्षांपासून चाणक्य मंडल दिल्लीतही अभिरूप मुलाखतींचे आयोजन करत असून देशभरातातील विद्यार्थ्यांचा त्याला उत्स्फूर्त आणि वाढता प्रतिसाद मिळत आहे. 

परीक्षेत उत्तरे कशी लिहावीत, त्यासाठी लागणारी तयारी कशी करावी याबद्दल धर्माधिकारी सरांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रात पहिली आलेल्या कश्मीरा संखे हिने दिली. तसेच देशात पहिल्या आलेल्या इशिता किशोरे हिने धर्माधिकारी सरांनी मुलाखतीसाठी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाचा खूप उपयोग झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.


चाणक्य मंडलचे संस्थापक आणि संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून प्रशासन स्वच्छ आणि कार्यक्षम ठेवत उत्तम काम करणारे 'कार्यकर्ता अधिकारी' होण्यासाठी यशस्वीतांना शुभेच्छा दिल्या आहेत.


*महाराष्ट्रात10000 चा यशस्वी टप्पा पूर्ण...*

*| बंसल क्लासेस महाराष्ट्राचे विद्यार्थी प्रवेश पूर्ण..*

https://aplaepaper.blogspot.com/2023/05/10000.html

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या