Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महाराष्ट्रात10000 चा यशस्वी टप्पा पूर्ण | बंसल क्लासेस महाराष्ट्राचे विद्यार्थी प्रवेश पूर्ण





51000 विद्यार्थी प्रवेशाकडे यशस्वी वाटचाल

महाराष्ट्राच्या ग्रामीण, शहरी भागामध्ये बंसल क्लासेसने सेवा देण्याचा विडा उचलला आहे. बंसल

छत्रपती संभाजीनगर /प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागात शैक्षणिक सेवा देत बंसल क्लासेसने नुकतेच 10000 विद्यार्थी प्रवेश पूर्ण केले आहेत. 51000 विद्यार्थी प्रवेशाचे ध्येयपूर्तीकडे बंसल क्लासेसची घोडदौड सुरू आहे. 


 राजस्थान कोटा येथील राष्ट्रविख्यात बंसल क्लासेसने महाराष्ट्र राज्यात आपल्या शैक्षणिक सेवेतून सिद्ध केले आहे की, बंसल क्लासेस हाच अनेक दशकांपासून लाखो डॉक्टर्स व इंजिनिअर घडविणारा कोचिंग ब्रँड आहे.


 बंसल क्लासेसला महाराष्ट्र राज्यात विद्यार्थी व पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. बंसल क्लासेसच्या महाराष्ट्रात 35 पेक्षा जास्त शाखा असून 


बंसल क्लासेसचे एमडी तथा सीईओ श्री.समीर बंसल सर हे दि. 15 मे पासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. सरांनी महाराष्ट्राच्या विविध बंसल क्लासेस शाखांना भेटी देत विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. त्यांच्या उपस्थितीमध्येच बंसल क्लासेसने 10 हजार विद्यार्थी प्रवेशाचा टप्पा पूर्ण केला आहे. 


बंसल क्लासेस महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक श्री. चंदुलाल बियाणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली बंसल क्लासेस महाराष्ट्र समूहाने हा यशस्वी टप्पा पूर्ण केलेला आहे. श्री. समीर बंसल सर व श्री चंदुलालजी बियाणी सर यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांचे आभार मानले आहेत. विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी बंसल क्लासेस समूह सदैव तत्पर असेल अशी ग्वाही समीर बंसल सर यांनी दिली आहे. बंसल क्लासेसचे सर्व शाखा व्यवस्थापक व इतर कर्मचारी यांचे देखील त्यांनी कौतूक व अभिनंदन केले आहे.


10000 विद्यार्थी प्रवेशाचा हा ऐतिहासिक क्षण श्री. समीर बंसल सर यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर रिजनल ऑफिस या ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी बंसल क्लासेस महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री. कैलास घुगे सर, स्टेट हेड विष्णू घुगे सर, कोटा हेड ऑफिसचे स्पर्श द्विवेदी सर व रवी प्रताप सिंह सर,  व्हाईस स्टेट हेड एस.एस.कादरी सर व सत्यजीत हैबते सर, गार्डीअन मॅनेजर सुरेश घुगे सर, मिडिया ॲण्ड क्रिएटीव्ह हेड गोविंद ठोंबरे सर, सेल्स हेड नामदेव कराड सर, अकॅडमीक हेड लकी चोयल सर व दिपेश गोचर सर, ॲडमीशन इंचार्ज संजय मिर्जी सर, परीक्षा विभाग प्रमुख धनंजय पांडे सर, तुलसीदास खटके सर, छत्रपती संभाजीनगर शाखेचे व्यवस्थापक रविंद्र घुगे सर व इतर कर्मचारी उपस्थित होते. 


बंसल क्लासेसचे येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये शंभर पेक्षा जास्त शाखांचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण तथा शहरी भागामध्ये बंसल क्लासेसने सेवा देण्याचा विडा उचलला आहे. बंसल क्लासेसला महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी व पालकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे तसेच बंसल क्लासेसचे निकालदेखील अधोरेखित करण्याजोगे आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या