Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर माहिती फलकावर परळी व औंढा ज्योतिर्लिंगाचा उल्लेख करावा-चंदुलाल बियाणी

 


--------------



श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात लावलेल्या माहिती फलकावर परळी व औंढा येथील ज्योतिर्लिंगाचा उल्लेख करावा-चंदुलाल बियाणी

परळी वैजनाथ / प्रतिनिधी

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांच्या माहितीसाठी लावल्या गेलेल्या माहिती फलकात श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परळी व औढा येथील नागनाथ ज्योतिर्लिंगाचा उल्लेख करावा अशी मागणी प्रभू वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समितीचे अध्यक्ष व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंदुलाल बियाणी यांनी केली आहे.

श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान तसेच जिल्हाधिकारी नाशिक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यटनमंत्री व इतर संबंधितांना दिलेल्या निवेदनात ही मागणी श्री बियाणी यांनी केली आहे. श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात भाविकांच्या माहितीस्तव लावण्यात आलेल्या माहिती फलकात देशभरातील विविध ज्योतिर्लिंगाचा उल्लेख आहे,परंतु त्यात परळी येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग व औंढा येथील श्री नागनाथ ज्योतिर्लिंग या दोन्हीही ज्योतिर्लिंगाचा उल्लेख नाही. तरी भाविकांच्या सोयीसाठी व माहितीसाठी लावल्या गेलेल्या या फलकावर हा उल्लेख करावा अशी मागणी श्री बियाणी यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान संस्थेच्या पदाधिकार्‍यांना भेटणार आहोत अशी माहिती श्री बियाणी यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या