Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शिवसेना जिल्हाप्रमुखपदी रत्नाकर शिंदे यांची निवड झाल्याबद्दल राजेश विभूते यांनी केला सत्कार



शिवसेना जिल्हाप्रमुखपदी रत्नाकर शिंदे यांची निवड झाल्याबद्दल राजेश विभूते यांनी केला सत्कार

परळी वैजनाथ/ प्रतिनिधी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बीड जिल्हा प्रमुख पदी निष्ठावंत शिवसैनिक रत्नाकर शिंदे यांची पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नुकतीच निवड करण्यात आली आहे. 

याबद्दल परळी शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश विभुते यांच्या वतीने श्री शिंदे यांचा केज येथे नुकताच भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांनी सांगितले की,विश्व हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार जनसामान्यापर्यंत पोहोचविणार असून, लवकरच गाव तेथे शाखा स्थापन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बीड जिल्हा प्रमुख पदी केज येथील गेल्या तीन दशकापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले निष्ठावंत शिवसैनिक रत्नाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. 

याबद्दल परळी शहर शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ नेते नारायणराव सातपुते माजी शहरप्रमुख भोजराज पालीवाल तसेच शहर प्रमुख राजेश विभुते यांच्या हस्ते श्री शिंदे यांचा भगवी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी बोलताना श्री रत्नाकर शिंदे म्हणाले की, विश्व हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार आपण घरोघरी पोहोचविणार असून 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करून विद्यार्थी, सर्वसामान्य गोरगरीब लोकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. 

तसेच शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव साहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख श्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते माजी खा चंद्रकांतजी खैरे साहेब, शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा घरोघरी पोहोचवून गाव तेथे शाखा स्थापन करणार असल्याचेही श्री रत्नाकर शिंदे यांनी सांगितले.

*शाखा सचिव ते जिल्हा प्रमुख*

केज तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवासी असलेले रत्नाकर शिंदे हे १९९० पासून शिवसेनेत कार्यरत आहेत.. १९९० साली शाखा सचिव, २००१ साली शाखा प्रमुख, २००२ साली तालुकाप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. या दरम्यान त्यांनी अनेक आंदोलने केली. त्यांच्यावर एमपीडीए नुसार कारवाई केल्याने त्यांना काही महिने तुरुंगवासही भोगावा लागला. मात्र एकनिष्ठतेचे फळ म्हणून आता जिल्हा प्रमुख पदावर वर्णी लागली आहे. केज, धारूर, माजलगाव, अंबाजोगाई, परळी या तालुक्यांचा कार्यभार त्यांच्याकडे असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या