Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अपघात |उसाच्या ट्रॉलीवर दुचाकी धडकली अपघातात या डॉक्टरचा मृत्यू





अपघात |उसाच्या ट्रॉलीवर दुचाकी धडकली अपघातात या डॉक्टरचा मृत्यू

सध्या सगळीकडेच कारखान्याला ऊस ट्रॅक्टर ट्रॉली द्वारे जात असून या ट्रॅक्टर ट्रॉली ला रिफ्लेक्टर नसल्यामुळे आतापर्यंत अशा घटना अनेक घडत आहेत. अश्याच लातूर ते जहिराबाद महामार्गावर तगरखेडा मोडजवळ उसाच्या ट्रॉलीला दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात हलगरा येथील डॉ.नीलेश हेडे यांचा मृत्यू झाला.ही घटना मंगळवारी रात्री 9.30 च्या सुमारास घडली.


निलंगा तालुक्यातील हलगरा येथील डॉ.नीलेश दीपक हेडे वय 35 हे औरद शहाजनी येथील दवाखान्यातील काम आटोपून हलगरा येथील आपल्या गावाकडे निघाले होते.रात्री 9.30च्या सुमारास त्यांची दुचाकी तगरखेडा मोडजवळ उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली. यामध्ये डॉ.निलेश हेडे हे गंभीर जखमी झाले. 



यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिनेशकुमार कोल्हे डॉ.हेडे यांना औरद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,उपचारापूर्वीच नीलेश हेडे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,आई,वडील व तीन भावंडे असा परिवार आहे

*अबबss परळीत चोरांचा सुळसुळाट वाढला..*

*एका पञकाराची दुचाकी पळवली| वाहने धोक्यात?*



👇👇 https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_85.html



*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*

👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या