Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मराठीत बातम्या सांगणाऱ्या महिला साडी का ? खा.सुप्रियाताई

 


मराठी भाषा बोलता ? मराठी संस्कृतीप्रमाणे कपडे का घालत नाही?.. खा. सुप्रियाताई सुळे

पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे मराठी पत्रकार परिषद चे 43 व्या राष्ट्रीय अधिवेशन होते  या कार्यक्रमात बोलताना खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी आपले मत मांडताना वृत्तवाहिन्यांवर बातम्या देणाऱ्या महिलांच्या बाबत केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी सरळ सोप्या भाषेत मराठी मनात बाणा कसा असतो हे स्पष्ट केले.


काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराशी बोलताना केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता.


 यानंतर सुप्रिया सुळे महिला पत्रकारांना साडी का घालत नाहीत? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. 'चॅनेलमधल्या मुली साडी का घालत नाहीत? शर्ट आणि ट्राउझर्स का घालतात? मराठी भाषा बोलता? मग आपण मराठी संस्कृतीप्रमाणे कपडे का घालत नाही? आम्ही प्रत्येक गोष्टीचं पाश्चिमात्यकरण करत आहोत', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

प्रत्येकाला आपली मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे त्यामुळे या मताचा आदर करायचा की आनदरचा हे प्रत्येकाला अधिकार आहे.



काय म्हणाले संभाजी भिडे? 

 संभाजी भिडे यांची मुख्यमंत्र्यांसोबत सदिच्छा भेट झाली होती,मात्र या भेटीनंतर एका महिला पत्रकाराने प्रश्न विचारल्याने संभाजी भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.


मंत्रालयातून बाहेर आल्यानंतर महिला पत्रकाराने संभाजी भिडे यांना मुख्यमंत्र्यांना का भेटायचे आहे, असे विचारले असता संभाजी भिडे यांनी या महिला पत्रकाराला उत्तर दिले नाही. 


तुम्ही टिकली लावली नाही म्हणून उत्तर देणार नाही असे संभाजी भिडे म्हणाले.प्रत्येक स्त्री ही भारतमातेची मूर्ती आहे असे आपल्याला वाटते...भारतमाता विधवा नाही.कुंकू लावा,मग मी तुमच्याशी बोलेन,'असे म्हणत संभाजी भिडे महिला पत्रकाराला उत्तर देत निघून गेले.


*थेट live...पुणे येथील मराठी पत्रकार 43 व अधिवेशन*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/live-43.html

*श्रद्धा,निधी नंतर आता कोणाची वाट पहातोय?*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_20.html

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या